मुकेश अंबानी यांची विहीण आहेत पद्मश्री, पंतप्रधानांसोबत केलंय काम; खूप कमी लोकांना माहितीये
भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा विवाह महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती अजर पिरामल आणि स्वाती पिरामल यांच्या मुलासोबत झाला आहे. पण खूप कमी लोकांना स्वाती पिरामल यांच्याबाबत माहिती आहे, त्या डॉक्टर आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री देखील मिळाला आहे. कोण आहेत त्या जाणून घ्या सविस्तर.
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब वेगवेगळ्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतं. अंबानी कुटुंबाने नुकतेच त्यांच्या धाकट्या मुलाचे लग्न केले आहे आणि आता सून आणि जावई यांच्यामुळे कुटुंब वाढलं आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुले आहेत. दोघांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचे लग्न प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामलसोबत झाले आहे. आनंद पिरामल हे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट कंपनीचे मालक अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचे पुत्र आहेत. 12 डिसेंबर 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते. पण मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीची सासू स्वाती पिरामल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दलच सांगणार आहोत.
स्वाती पिरामल या दिसायला खूप सुंदर आहेत. स्वाती पिरामल यांची खासियत म्हणजे नुसते त्यांचे सौंदर्यच नाही तर त्या खूप प्रतिभावान आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतलीये. इतकंच नाही तर आनंद पिरामल यांची आई स्वाती या पिरामल एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या व्हाइस चेअरपर्सन देखील आहेत. स्वाती मिरामल या मुंबईतील गोपाल कृष्ण पिरामल हॉस्पिटलच्या संस्थापक आहेत आणि गोपाल कृष्ण पिरामल हे त्यांचे सासरे आहेत.
माजी पंतप्रधानांसोबत केले काम
फार कमी लोकांना माहित आहे की स्वाती पिरामल 2010 ते 2014 पर्यंत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत वैज्ञानिक सल्लागार परिषद आणि पंतप्रधानांच्या व्यापार परिषदेच्या सदस्या होत्या. यासोबतच आयआयटी मुंबई आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या बोर्ड सदस्यांमध्येही त्यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, जगातील 25 पॉवरफुल महिलांच्या यादीत स्वाती पिरामल यांचं नाव आठ वेळा सामील झाले आहे.
पद्मश्रीने सन्मानित
स्वाती पिरामल या सामाजिक सेवा कार्य आणि सार्वजनिक आरोग्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी देखील ओळखल्या जातात. त्यामुळे 2012 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही स्वाती पिरामल या स्वभावाने अतिशय साध्या आहेत. सून ईशा अंबानीसोबतही त्या खूप मैत्रीपूर्ण वागतता. तिचा मुलगा आणि सून तसेच तिच्या मुलीवर तिचे खूप प्रेम आहे. आनंद हे पिरामल ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक पदावर आहेत आणि रिअल इस्टेटचा व्यवसायही सांभाळतात.