Mukesh Ambani : मोठी बातमी, मुकेश अंबानी देणार होम लोन, जाणून घ्या त्यांच्या कंपनीचा प्लान

Mukesh Ambani : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज समूह वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. रिलायन्सच्या सर्वच उत्पादनांनी नेहमीच यश मिळवलय. आता मुकेश अंबानी लवकरच सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नातील घर बनवण्यासाठी मदत करणार आहेत. होम लोन देण्यासाठी त्यांच्या कंपनीचा प्लान काय? जाणून घ्या.

Mukesh Ambani : मोठी बातमी, मुकेश अंबानी देणार होम लोन, जाणून घ्या त्यांच्या कंपनीचा  प्लान
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 2:53 PM

मुकेश अंबानी हे आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती आहेत. लवकरच ते देशातील जनतेला स्वप्नातल घर बनवण्यासाठी मदत करणार आहेत. NBFC कंपनी जियो फायनेंशियल सर्विसेस लवकरच सर्वसामान्यांना होम लोन देण्याचा प्लान बनवत आहे. त्यासाठी कंपनीने काम सुरु केलय. मुकेश अंबानी यांनी मागच्यावर्षी एनबीएफसी कंपनी जियो फायनेंशियल सर्विसेस सुरु केली. शुक्रवारी जियो फायनेंशियलचा शेअर एक टक्क्यापेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने कशा पद्धतीचा प्लान बनवलाय जाणून घ्या.

जियो फायनेंशियल सर्विसेस ही बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. जियो फाइनेंशियल सर्विसेस लिमिटेडने शुक्रवारी सांगितलं की, ते होम लोन सर्विस सुरु करण्याच्या फायनल फेजमध्ये आहेत. त्यांनी टेस्टिंग म्हणून (बीटा) सुरु केलय. त्याशिवाय कंपनी संपत्तीवर लोन आणि सिक्योरिटीजवर लोन सारखे दुसरे प्रोडेक्टही सादर करणार आहे,

संपत्तीवर लोन देणार का?

शुक्रवारी पहिली वार्षिक बैठक झाली. त्यानंतर शेयरधारकांना संबोधित केलं. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ हितेश सेठीया म्हणाले की, “आम्ही होम लोन सेवा सुरु करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. चाचणी म्हणून आम्ही काही गोष्टी सुरु केल्या आहेत” संपत्तीवर लोन आणि सिक्योरिटीज वर लोन सारखी उत्पादन सुद्धा आहेत.

कंपनीच्या शेअरचा भाव काय?

एकदिवस आधी शुक्रवारी जियो फायनेंशियल सर्विसेसच्या शेयर्समध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली. बीएसईच्या आकड्यानुसार 1.21 टक्के घसरणीसह शेअर 321.75 रुपयावर बंद झाला. दिवसभरात कंपनीचा हा शेयर 320.50 रुपये या लोअर लेवलला सुद्धा पोहोचला होता. जियो फायनेंशियल शेयरचा 52 आठवड्यातील हाय 394.70 रुपये आहे. कंपनीच मार्केट कॅप 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.