Mukesh Ambani : गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर गोड हसू! Jio Financial चा शेअर वधारला की राव

Mukesh Ambani : जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेच्या शेअरने बाजारात उसळी घेतली. लॉचिंगपासून हा शेअर तळमळ्यात करत असल्याने गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला होता. शेअरची किंमत 220.25 रुपयांहून बुधवारी इतक्या रुपयांपर्यंत वधारली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. विमा क्षेत्रात उतरणार असल्याची घोषणा झाल्यानंतर दिग्गज कंपन्या पण आता सतर्क झाल्या आहेत.

Mukesh Ambani : गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर गोड हसू! Jio Financial चा शेअर वधारला की राव
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:44 AM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील (Reliance Industry Group) आर्थिक व्यवस्थापनासाठी नवी कंपनी स्थापन्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना हे शेअर त्यांच्या डीमॅट खात्यात जमा करण्यात आले. बाजारातसूचीबद्ध झाल्यापासून या शेअरचे तळ्यातमळ्यात सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला होता. नुकतीच रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण बैठक ( Reliance AGM) झाली. त्यात भविष्यातील अनेक योजनांची वर्दी देण्यात आली. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या माध्यमातून रिलायन्स आर्थिक क्षेत्रात डिजिटल बदलाची नांदी आणणार आहे. विमा क्षेत्रात पण जिओ उतरेल. त्यासाठी अमेरिकेतील सर्वात मोठ्या गुंतवणूक फर्म ब्लॅकरॉकसोबत (Blackrock) त्यांनी करार केला आहे. या घडामोडींचा मोठा परिणाम या कंपनीच्या शेअरवर दिसून आला. जिओ फायनेन्शिअलचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. या सकारात्मक बदलाने गुंतवणूकदारांच्या चेहरे खुलले.

असा वधारला शेअर

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेचा शेअर बुधवारी जोरदार उसळला. त्याने 5 टक्क्यांची झेप घेतली. या शेअरने आतापर्यंतचा सर्वाधिक परतावा दिला. हा शेअर लवकरच वेगाने धावेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना आला आहे. सुरुवातीपासूनच घसरणीवर असलेल्या या शेअरने आता गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.

हे सुद्धा वाचा

आशियातील बाजारात तेजी

आशियातील बाजारात तेजीचे सत्र होते. बुधवारी भारतीय बाजारावर पण त्याचा परिणाम दिसून आला. सेन्सेक्स 11.43 अंक म्हणजे 0.018% मजबूत झाला. सेन्सेक्स 65,087.25 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 4.80 अंक म्हणजे 0.025% मजबूत झाला. निफ्टी 19,347.45 अंकांवर बंद झाला.

विमा क्षेत्रात भरारी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 28 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत समूहाच्या वाटचालीचे चित्र रंगवले. त्याची दिशा आणि अजेंडा सर्वांसमोर ठेवला. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज विमा क्षेत्रात उतरण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जिओ फायनेन्शिअलचा शेअर वधारला. ही घोषणा कंपनीच्या पथ्यावर पडली. बुधवारी जिओ फायनेन्शिअलचा शेअर 4.99% मजबुतीसह बंद झाला.

224 रुपयांवर झाला बंद

जिओ फायनेन्शिअलचा शेअर काल 220.25 रुपयांहून वधारला. बुधवारी तो 224 रुपयांवर बंद झाला. दिवसभरात या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. बाजार बंद होताना हा शेअर 11.00 रुपये म्हणजे 4.99% मजबुतीसह 231.25 रुपये प्रति शेअर किंमतीवर पोहचला. तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये किंचित घसरण झाली. हा शेअर 0.95 रुपयांनी घसरुन 2,419.40 रुपये प्रति शेअरवर काल बंद झाला.

दिग्गजांना फुटला घाम

जिओ, विमा क्षेत्रात उतरल्याने अनेक दिग्गजांना झटका बसणार आहे. कारण या स्मार्ट विमा योजना केवळ योजना नसतील, तर एक पॅकेज असेल, ज्यात ग्राहकांना काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. त्यासाठी जागतिक विमा कंपन्यांशी रिलायन्स हातमिळवणी करण्यात आली आहे. या कंपन्यांचा एनालिटिक्स डाटाचा वापरण्यात येईल. विमा क्षेत्रात येत्या काही दिवसांत मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.