Mukesh Ambani | सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी पण फिदा; खुल्या दिलाने केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

Mukesh Ambani | अब्जाधीश उद्योगपतींच्या कुंभमेळ्यात व्हायब्रंट गुजरातचा हुंकार भरण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्धघाटन सत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तूतीसुमने उधळली. मोदी है तो मुमकीन है, ही घोषणा भाजप आणि त्यांचे समर्थक यापूर्वीच देत आहेत. त्यात आता उद्योजक पण त्यांच्यावर फिदा झाले आहेत.

Mukesh Ambani | सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी पण फिदा; खुल्या दिलाने केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 2:10 PM

नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : गुजरातमध्ये उद्योजकांचा मेळा भरला आहे. व्हायब्रंट गुजरात-2024 चे उद्धाटन आज झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे देश-विदेशातील उद्योगपतींचा कुंभमेळा भरला. उद्धघाटन सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजये चेअरमन आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तूती सुमने उधळली. पंतप्रधान मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच गुजरात राज्यात गुंतवणूकीसाठी अनेक घोषणा पण केल्या. तर इतर उद्योगपतींनी सुद्धा गुजरात राज्यात गुंतवणुकीविषयी मोठ्या घोषणा केल्या.

रिलायन्स गुजराती कंपनी

मुकेश अंबानी यांनी गुजरात राज्याला आधुनिक भारताचे वृद्धीचे प्रवेश द्वार असल्याचे सांगितले. रिलायन्स ही नेहमीच गुजरातची कंपनी होती आणि राहील असे ते म्हणाले. त्यांनी गुजराती असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. परदेशातील लोक जेव्हा नवीन भारताविषयी विचार करतात, तेव्हा नवीन गुजरातविषयी पण विचार करतात. हा बदल झाला कशामुळे? मोदी यांच्यामुळे हा बदल झाला. ते जागतिक पटलावर मोठे नेते म्हणून समोर आल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

लवकरच सुरु करणार गीगा फॅक्टरी

मुकेश अंबानी हे गुजरात राज्यात बॅटरी उत्पादन प्रकल्प लवकरच सुरु करणार आहेत. वर्ष 2024 मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनी गुजरातमध्ये गीगा फॅक्टरी सुरु करण्याची तयारी करत आहे. राज्याचा जीडीपी 2047 पर्यंत 3000 अब्ज डॉलरपर्यंत पोहचेल. तर भारताची अर्थव्यवस्था 35,000 अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. रिलायन्स गुजरातमधील हजीरा येथे भारतातील पहिला कार्बन फायबर सुविधा सुरु करणार आहे.

अदानी-मित्तल-टाटा-मारुतीची मोठी घोषणा

  • मारुती गुजरातमध्ये दुसरा प्रकल्प उभारण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
  • टाटा समूह धोलेरामध्ये सर्वात मोठी सेमीकंडक्टर फॅक्टरी सुरु करेल.
  • तर येत्या दोन महिन्यात साणंदमध्ये लिथियम-आयन बॅटरीसाठी गीगा फॅक्टरी सुरु करण्यात येईल
  • पेटीएम गिफ्ट सिटीत 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
  • अदानी समूह पुढील 5 वर्षांत गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करेल.
  • अदानी समूह कच्छमध्ये 30 गीगावॅट क्षमतेचा ग्रीन एनर्जी पार्क सुरु करेल. तो अंतराळातून पण दिसेल.
  • आर्सेलर मित्तल 2029 पर्यंत हजीरामध्ये जगातील सर्वात मोठा स्टील कारखाना सुरु करेल.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.