मुकेश अंबानीसाठी राधिका ठरली ‘धनलक्ष्मी’, दहा दिवसांत इतक्या कोटीने वाढली संपत्ती
mukesh ambani net worth: मुकेश अंबानी यांची आर्थिक कुशाग्रता आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भक्कम कामगिरीमुळे त्यांची संतप्ती वाढत आहे. अनंत यांच्या लग्नात मोठा खर्च करुन त्यांची संपत्ती वाढत आहे. त्यामुळे राधिका मुकेश अंबानीसाठी धनलक्ष्मी ठरली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानीचे लग्न 12 जुलै रोजी धुमधडक्यात झाले. या लग्नात आणि प्री वेडिंगमध्ये मोठा खर्च झाला. सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपैकी हा खर्च केवळ 0.5 टक्के आहे. मुकेश अंबानी यांच्यासाठी नवीन सून राधिका धनलक्ष्मी ठरली आहे. कारण मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत भरभरून वाढ झाली आहे.
12 जुलै 2024 रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे भव्यदिव्य लग्न झाले. या लग्नात जगभरातील दिग्गज आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या लग्नास आले होते. लग्नानंतर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घसघसीत वाढ झाली आहे. केवळ दहा दिवसांत मुकेश अंबानी यांची संपत्ती 25,000 (तीन हजार बिलियन डॉलर) कोटींनी वाढल्याचा रिपोर्ट ‘आजतक’ ने दिला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्स’नुसार, 5 जुलै 2024 रोजी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 118 बिलियन डॉलर होती. 12 जुलै रोजी ती 121 बिलियन डॉलर झाली. यामुळे मुकेश अंबानी जागतिक श्रीमंताच्या यादीत 12 व्या वरुन 11क्रमांकावर आले. तसेच आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
रिलायन्सचे शेअर असे वाढत राहिले
अंबानी यांची संपत्ती वाढ ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ च्या शेअरमुळे झाली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिलायन्सच्या शेअरमध्ये 1% वाढ झाली. मागील महिन्यात या शेअरमध्ये 6.65 टक्के वाढ झाली. सहा महिन्यांमध्ये रिलायन्सचे शेअर 14.90% वाढले आहे. यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढली आहे.
राधिका ठरली लकी
मुकेश अंबानी यांची आर्थिक कुशाग्रता आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भक्कम कामगिरीमुळे त्यांची संतप्ती वाढत आहे. अनंत यांच्या लग्नात मोठा खर्च करुन त्यांची संपत्ती वाढत आहे. त्यामुळे राधिका मुकेश अंबानीसाठी धनलक्ष्मी ठरली आहे. या लग्नात झालेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई मुकेश अंबानी यांनी गेल्या दहा दिवसांत केली. धाकटी सून राधिका मर्चंटचे पाऊल अंबानी कुटुंबासाठी खूप शुभ ठरल्याचे चर्चा सुरु आहे.