Mukesh Ambani : जागतिक श्रीमंतांच्या यादीत उलटफेर, मार्क झुकरबर्गला मुकेश अंबानी यांची धोबीपछाड, गौतम अदानी यांचा नंबर कितवा

Mukesh Ambani : जागतिक श्रीमंतांच्या यादीत उलटफेर झाला आहे. फेसबुकचे मार्क झुकरबर्गला मुकेश अंबानी यांनी धोबीपछाड दिला आहे. पण या यादीत गौतम अदानी यांचा नंबर कितवा आहे...

Mukesh Ambani : जागतिक श्रीमंतांच्या यादीत उलटफेर, मार्क झुकरबर्गला मुकेश अंबानी यांची धोबीपछाड, गौतम अदानी यांचा नंबर कितवा
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली : जगातील अब्जाधिशांच्या यादीत पुन्हा उलटफेर झाला. भारतीय उद्योगपती आणि आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी उडी घेतली. त्यांनी फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना धोबीपछाड दिली. यापूर्वी झुकरबर्ग यांनी अंबानी यांना मागे टाकले होते. आता मुकेश अंबानी या यादीत 13 व्या स्थानावरुन 12 व्या स्थानावर आले आहेत. रिलायन्सने अनेक क्षेत्रात एंट्री करत बाजारालाच नाही तर उद्योगजगताला पण चकित केले आहे. आता आर्थिक क्षेत्रातही रिलायन्सची वित्तीय कंपनी दबदबा तयार करणार आहे. तर काही ब्रँडची खरेदी पण रिलायन्स केली आहे. त्यामुळे ब्लूमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीत (Bloomberg Billionaires Index) ते एक पायरी पुढे सरकले आहेत. या यादीत गौतम अदानी आहेत तरी कुठे?

इतकी वाढली संपत्ती ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्समध्ये आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एकाच दिवशी 5.06 दशलक्ष डॉलर इतकी वाढ झाली. आता मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 85.8 अब्ज डॉलर झाली आहे. तर मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या एकूण संपत्तीत 24 तासात 35.1 दशलक्ष डॉलरची वाढ झाली. आता त्यांची एकूण संपत्ती 85.5 अब्ज डॉलर आहे. मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीत आता 13 व्या स्थानी आहेत.

गौतम अदानी यांना फटका भारताचे दुसरे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या मागील शुल्ककाष्ठ अजूनही संपलेले नाही. गेल्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. या घसरगुंडीमुळे ते यादीत 21 व्या स्थानावरुन थेट 23 व्या स्थानापर्यंत घसरले आहे. एकाच दिवसात गौतम अदानी यांना 704 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले. त्यांची एकूण संपत्ती आता 56.4 अब्ज डॉलर इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

64.2 अब्ज डॉलरचे नुकसान हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घसरण झाली आहे. गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत 36 व्या स्थानावर पोहचले होते. पण ते अब्जाधिशांच्या यादीत पुन्हा परतले. ते श्रीमंतांच्या यादीत 23 व्या स्थानावर पोहचले आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत गौतम अदानी यांना 64.2 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला अद्यापही हादरे बसत आहेत.

हे आहेत सर्वात श्रीमंत ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्समध्ये सर्वात श्रीमंत म्हणून बर्नार्ड अरनॉल्ट यांचे स्थान अबाधित आहे. त्यांची एकूण संपत्ती 207 अब्ज डॉलर आहे. एलॉन मस्क हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 168 अब्ज डॉलर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.