मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना गल्लीपासून दिल्ली, तसेच संपूर्ण जग ओळखतं. कारण त्यांची ख्यातीच तशी आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. फक्त भारतच नाही तर अख्ख्या आशिया (Asia) खंडात त्यांचा गाजावाजा आहे. ते आशिया खंडातील एक नंबरचे श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची संपत्तीच तितकी आहे. याशिवाय जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा सध्या तरी 12 वा नंबर लागतो. आपल्या देशाच्या या उद्योगपतीचा आशिया खंडासह जगात गाजा आहे, ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. पण अंबानी यांच्याबद्दल एक वाईट बातमी समोर आलीय. अंबानी यांचं आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतलं पहिलं स्थान जाऊ शकतं. कारण चीनमधला एक उद्योगपती पहिला क्रमांकाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.
मुकेश अंबानी यांचं यावर्षी 10 अब्ज डॉलर पेक्षा जास्त पैशांचं नुकसान झालंय. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला बघायला मिळालीय. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स ट्रेंड करत असल्याचं देखील बघायला मिळालंय. पम गेल्या वर्षभरात शेअर्स खाली पडले आहेत. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही कपात झालीय.
ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ ही 77.1 अब्ज डॉलर इतकी आहे. यावर्षी मुकेश अंबानी यांच्या एकूण नेटवर्थमध्ये 10.1 अब्ज डॉलरची घट झाली. त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत 8व्या क्रमाकांवरुन थेट 12व्या क्रमांकावर पोहोचले.
तरीही मुकेश अंबानी आजही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योपतींमध्ये प्रथम क्रमांकाचे उद्योगपती आहेत. पण त्यांचं पहिलं स्थान कदाचित भविष्यात जाऊ शकतं. कारण मुकेश अंबानी यांच्या पाठीमागे अवघ्या दोन पावलांवर चीनचे सर्वात श्रीमंत उद्योगपती झोंग शैनशैन आहेत. त्यांच्या संपत्तीत यावर्षी एकूण 788 मिलियन डॉलरची वाढ झालीय आणि त्यांची नेटवर्थ ही 68.3 अब्ज डॉलर इतकी आहे. असं असलं तरीही मुकेश अंबानी यांची संपत्ती चीनचे अब्जाधिशाच्या नेटवर्थ जवळपास 9 अब्ज डॉलर इतकी कमी आहे
विशेष म्हणजे चीनचे उद्योगपती झोंग शैनशैन हे डिसेंबर 2020 मध्ये मुकेश अंबानी यांच्या पुढे निघून गेले होते. पण त्यांचा पहिला क्रमांक फार काळ टिकला नाही. कारण लगेच थोड्या दिवसांनी मुकेश अंबानी पुन्हा पहिल्या स्थानावर आले. झोंग शैनशैन यांची चीनमध्ये बिसलेरी सारखीच Nongfu Spring नावाची पाण्याच्या बाटलींची कंपनी आहे. तसेच त्यांची लस बनवणारी देखील एक कंपनी आहे. या दोन्ही कंपनींचे शेअर्स सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे.