मुकेश अंबानी यांची दिवाळी शॉपिंग, इंग्रजांची ही कंपनीच घेतली विकत, किती कोटींची झाली डील?

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्यासाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. रिझर्व बँकेने त्यांच्या कंपनीला ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून परवाना दिला आहे. जिओ फाइनेंशियल सव्हिसेसची सब्सिडियरी जिओ पेमेंट सोल्यूशंस लिमिटेडला ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून मंजुरी मिळाली आहे.

मुकेश अंबानी यांची दिवाळी शॉपिंग, इंग्रजांची ही कंपनीच घेतली विकत, किती कोटींची झाली डील?
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 6:53 AM

रिलायन्स समूह देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. या कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांनी दिवाळीची मोठी शॉपींग केली आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ब्रिटनमधील पूर्ण कंपनी विकत घेतली आहे. 2021 मध्ये ही डील झाली होती. त्यातील राहिलेली भागेदारीही या कंपनीने विकत घेतली आहे. रियालन्सची उपकंपनी एनर्जी सोलर लिमिटेडच्या (आरएनईएसएल) माध्यमातून पॅराडियन लिमिटेड ही कंपनी विकत घेतली आहे. या कंपनीचा राहिलेला आठ टक्के वाटाही आता रिलायन्सचा झाला आहे. यामुळे संपूर्ण कंपनीवर आता रिलायन्स समुहाची मालकी झाली आहे.

25 दशलक्ष युरोची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जीने ब्रिटीश कंपनी पॅराडियन लिमिटेड संपूर्ण हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने 2021 मध्ये ही डील केली होती. ब्रिटीश कंपनी पॅराडियन लिमिटेड आयन बॅटरी तंत्रज्ञानावर काम करते. रिलायन्सने पॅराडियन कंपनीत राहिलेला 8 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. डिसेंबर 2021 मध्ये रिलायन्सने पॅराडियन लिमिटेड या कंपनीशी 100 दशलक्ष युरोचा करार केला होता. रिलायन्सने या कंपनीमध्ये 25 दशलक्ष युरोची गुंतवणूक केली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजने 28 ऑक्टोबर 2024 रोजी पॅराडियन लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांकडून उर्वरित इक्विटी स्टॉक घेतले आहेत. यामुळे पॅराडियन लिमिटेड आता पूर्णपणे मुकेश अंबानी यांच्या मालकीची उपकंपनी बनली आहे.

हे सुद्धा वाचा

रिलायन्सकडून हा ही करार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकन चिप निर्माता कंपनी नवीडिया यांच्यात करार झाला आहे. हा करार भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये (AI) पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. ही भागीदारी भारताला AI क्षेत्रात आघाडीवर असलेला देश बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

मुकेश अंबानी यांच्यासाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. रिझर्व बँकेने त्यांच्या कंपनीला ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून परवाना दिला आहे. जिओ फाइनेंशियल सव्हिसेसची सब्सिडियरी जिओ पेमेंट सोल्यूशंस लिमिटेडला ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून मंजुरी मिळाली आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.