मुकेश अंबानी का बंद करत आहे आपली ही दुकान, देशभरात 80 स्टोअर्स बंद?, काय आहे कारण?
Mukesh Ambani: रिलायन्स रिटेलने या आर्थिक वर्षातही विस्ताराचा वेग कमी केला आहे. तसेच रियायन्सचे स्टोअर्स बंद होण्यामध्ये वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केवळ 110 निव्वळ स्टोअर्स जोडले गेले आहेत. तसेच रिलायन्सने 795 स्टोअर उघडले होते.
देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेल आपल्या डिपार्टमेंट चेनमध्ये सेंट्रो स्टोअर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करत आहे. दोन वर्षांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी सेंट्रो स्टोअर्स सुरु केले होते. आता रिलायन्सचे हे 80 स्टोअर्स बंद होणार आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल डिव्हीजन फ्यूचर ग्रुपच्या सेंटरला सेंट्रोमध्ये बदलले होते. आता ते का बंद होत आहे…
रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तीन स्टोअर बंद झाले आहे. तसेच महिन्याच्या शेवटी दोन डझन स्टोअर्स बंद होणार आहे. हे स्टोअर्सचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या हे स्टोअर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद होत आहे. आपले बँडला पुन्हा चांगले स्थान मिळवून देण्यासाठी रिलायन्स रिटेलने हे पाऊल उचलले आहे.
इकोनॉमिक्स टाइम्समधील रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेलने रीमॉडलिंग प्रक्रियेसाठी देशभरातील सर्व सेंट्रो आउटलेट्स तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आउटलेटवर मालचे प्रदर्शन, भंडारण आणि मालाची विक्री बंद केली आहे. स्टोअर्स पुन्हा सुरु झाल्यावर रियायन्स रिटेल स्थानिक आणि जागतिक बँडला आपल्या स्टोअर्समध्ये जागा देणार की नाही? हे निश्चित नाही. रिलायन्सने गॅप आणि सुपरड्रायसारख्या आंतरराष्ट्रीय बँडसह 80 विदेशी बँडसोबत करार केला आहे. तसेच त्यांच्याकडे अजोर्टे आणि यूस्टासारखे बँड आहे.
सेंट्रोमधून 450 स्थानिक आणि जागतिक बँडची विक्री होते. दुबईमधील लाइफस्टाइल इंटरनॅशनल आणि रहेजा शॉपर्स स्टॉपला चांगली स्पर्धा हे बँड देत आहे. कोरोनानंतर भारतीय बाजारातील विक्री चार टक्के कमी झाली आहे. त्यानंतर रिलायन्स आपले अस्तित्व टिकवून आहे.
किती स्टोअर्स बंद?
रिलायन्स रिटेलने या आर्थिक वर्षातही विस्ताराचा वेग कमी केला आहे. तसेच रियायन्सचे स्टोअर्स बंद होण्यामध्ये वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केवळ 110 निव्वळ स्टोअर्स जोडले गेले आहेत. तसेच रिलायन्सने 795 स्टोअर उघडले होते. रिलायन्स रिटेल आपल्या बँडला प्रमोट करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. यामुळे रिलायन्सचा फायदाच होणार आहे.