Mukesh Ambani : 100 वर्षांची ही कंपनी आता अंबानी समूहाची, नवीन वर्षातील पहिली मोठी बिझनेस डील, या क्षेत्रात वाढणार दबदबा

Mukesh Ambani : Reliance समूहात 100 वर्षे जुनी कंपनी दाखल होणार आहे.

Mukesh Ambani : 100 वर्षांची ही कंपनी आता अंबानी समूहाची, नवीन वर्षातील पहिली मोठी बिझनेस डील, या क्षेत्रात वाढणार दबदबा
हा उद्योगही भात्यात
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सातत्याने त्यांच्या उद्योगाचा पसारा वाढवत आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होत आहे. नवनवीन उद्योग सुरु करत आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये त्यांनी एकानंतर एक नवीन करार केला आहे. तर यावर्षीच्या सुरुवातीला 2023 मध्ये रिलायन्स उद्योग समूहाने (Reliance Industries Group) आणखी एक मोठी डील केलेली आहे. रिलायन्स समूहाच्या Reliance Retail ने पुन्हा एक नवीन उद्योग त्यांच्या ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील 100 वर्ष जुनी बेवरेज कंपनी सोस्योचा (Sosyo) अर्धा हिस्सा रिलायन्स समूहाचा असेल.

रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) गुजरातमधील सोस्योची अर्धी हिस्सेदारी संपादन करणार आहे. कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स (CSD) आणि ज्यूस तयार करणारी सोस्यो हजुरी बेवरेजेज प्रायव्हेट लिमिटेड (SHBPL) मध्ये 50 टक्के हिस्सा रिलायन्सचा असेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही मोठी डील होत आहे.

हे सुद्धा वाचा

Reliance Retail कडून मंगळवारी याविषयीचे निवेदन जारी करण्यात आले. हे संपादन रिलायन्स समूहाच्या बेवरेजेस पोर्टफोलिओ वाढविण्यास मदत होईल. सोस्यो ही गुजरातमधील 100 वर्ष जुनी कंपनी आहे. या कंपनीतील 50 टक्के हिस्सा हजुरी कुटुंबियांकडे राहणार आहे.

Sosyo कार्बोनेटेड शीतपेय (CSD) आणि ज्यूस तयार करणारा 100 वर्ष जुना ब्रँड आहे. या ब्रँडची सुरुवात 1923 मध्ये अब्बास अब्दुलरहीम हजुरी यांनी केली होती. ही फर्म घरगुती शीतपेय बाजारातील सर्वोत्तम ब्रँड आहे. या कंपनीचे उत्पादने गुजरातसह भारतात लोकप्रिय आहेत.

या कंपनीची गुजरातमध्ये Sosyo, Kashmira, Lemee, Ginlim, Runner, Opener, Hajoori Soda आणि S’eau अशा विविध शीतपेयांची उत्पादने लोकप्रिय आहेत. या कंपनीकडे जवळपास 100 फ्लेवर आहेत. आता या कंपनीत रिलायन्सचा 50 टक्के हिस्सा आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.