मुकेश अंबानी अमेरिकेत पोहचले, चीनची उडली झोप, एआय बनवण्यासाठी भारतीयाला दिला…
Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीकडून एआयबाबत कंपनीच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती. भारताच्या एआय लँडस्केपमध्ये जिओ खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात कंपनीच्या भविष्यात हे खूप महत्वाचे ठरणार आहे.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी रिलायन्स समुहाच्या माध्यमातून देशात विविध प्रकल्प सुरु करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते आणि देशाच्या विकासाला हातभार लागत आहे. आता मुकेश अंबानी अमेरिकेत पोहचले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी असे पाऊल उचलले आहे की, त्यामुळे चीनची झोप उडाली आहे. एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडला गेला आहे. चीन एआय डेटा सेंटर बनवत आहे. त्याच पद्धतीची रणनीती जिओकडून बनवली जात आहे. त्यासाठी अमेरिकेतील भारतीय स्टार्टअपला मोठा फंड मुकेश अंबानी यांनी दिला आहे.
आकाश अंबानीकडून एआयवर भर
मुकेश अंबानी यांनी अमेरिकेत असलेल्या एका स्टार्टअपला फंड दिला आहे. त्या माध्यमातून हे स्टार्टअप भारतात एआय सुरु करणार आहे. ही कंपनी भारतीय आहे. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी अमेरिकेत आहेत. त्या ठिकाणी ते स्टार्टअप टीडब्लूओच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी कंपनीचे फाउंडर प्रणव मिस्त्री यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर आले आहेत. टीडब्लूओ एआय टेक्नोलॉजीवर काम करत आहे. त्याला जिओ सपोर्ट करत आहेत.
20 दक्षलक्ष डॉलरचा निधी
आकाश अंबानी यांच्याकडून एआयवर जोर दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी आकाश अंबानी मुंबई आयआयटीत गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी एआयवर चर्चा केली होती. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी टीडब्लूओला 20 दक्षलक्ष डॉलरचा निधी दिला आहे. या प्रकल्पाच टीडब्लूओसोबत दक्षिण कोरियाची कंपनीसुद्धा सहभागी झाली आहे.
जिओचे भागीदार बनवण्याची संधी- मिस्त्रा
स्टार्टअपच्या सुरुवातीपासूनच मुकेश अंबानी पाठिंबा देत आहेत. एका मुलाखतीदरम्यान कंपनीचे संस्थापक प्रणव मिस्त्री म्हणाले होते की, एआय बाबत मुकेश अंबानी यांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. जिओचे भागीदार बनून आम्हाला बाजारात प्रवेश करण्याची संधी मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीकडून एआयबाबत कंपनीच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती. भारताच्या एआय लँडस्केपमध्ये जिओ खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात कंपनीच्या भविष्यात हे खूप महत्वाचे ठरणार आहे.