AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share : गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! मिळाला जोरदार परतावा, आता फ्री शेअरचा बोनस

Multibagger Share : गुंतवणूकदारांना या शेअरने जोरदार परतावा दिला आहे. हा मल्टिबॅगर स्टॉक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांत या शेअरने जोरदार परतावा दिला. या स्टॉकमध्ये आज अप्पर सर्किट लागले. आता गुंतवणूकदारांना शेअरचे बोनस मिळण्याचे वृत्त समोर आले आहे.

Multibagger Share : गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! मिळाला जोरदार परतावा, आता फ्री शेअरचा बोनस
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : भारतीय शेअर बाजारात काही शेअर चर्चेत नसले तरी परतावा देण्यात मात्र आघाडीवर आहेत. त्यांचा शोध आणि निवड करणे हेच खरं कसब असते. मल्टिबॅगर स्टॉक जेनसॉल इंजिनिअरिंगने (Gensol Engineering Share) अशीच कमाल केली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना अवघ्या दोन वर्षांतच मालामाल केले आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 2,346 कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना जवळपास 110 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अजून एक गुडन्यूज आली आहे. कंपनीने भारतीय शेअर बाजाराला (Share Market) माहिती दिली आहे. त्यानुसार 5 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. त्यात बोनस शेअर इश्यू (Bonus Share Issue) करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

शेअरला अप्पर सर्किट

बोनस शेअर इश्यू करण्यासाठीच्या प्रस्तावाचे वृत्त लागलीच बाजारात येऊन धडकले. जेनसॉल इंजिनिअरिंगचा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्यामुळे या शेअरच्या भावात आज 5 टक्के अप्पर सर्किट लागले. हा शेअर आज 1920 रुपयांच्या स्तरावर पोहचला. यापूर्वीच्या सत्रात या शेअरचा भाव 1,828.60 रुपये होता. तर दोन वर्षांपूर्वी हा शेअर तर अवघ्या 60 रुपयांच्या जवळपास ट्रेंड करत होता.

हे सुद्धा वाचा

दमदार रिटर्न

दलाल स्ट्रीटचे गुंतवणूकदार अनेक वर्षांपासून या स्टॉकवर भरवसा ठेऊन आहेत. या आठवड्यात पण या स्टॉकने दोनदा अप्पर सर्किट लावले. जेनसॉल इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या पाच सत्रात जवळपास 12 टक्क्यांनी वधारला आहे. या एका महिन्यात या स्टॉकने जवळपास 15 टक्क्यांची चढाई केली. जेनसॉल इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या सहा महिन्यात 41.44 टक्क्यांनी वधारला. सहा महिन्यांपूर्वी या शेअरचा भाव 900 रुपयांच्या घरात होता. आज हा शेअर 1920 रुपयांवर पोहचला आहे. या वर्षात या शेअरने आतापर्यंत 90 टक्के उसळी घेतली.

दोन वर्षांत 3100% रिटर्न

डिसेंबर 2021 मध्ये या शेअरचा भाव 59 रुपयांच्या घरात होता. त्यानंतर या शेअरने रॉकेट भरारी घेतली. गेल्या दोन वर्षांत या शेअरने गगन भरारी घेतली. दोन वर्षांत या शेअरने 3100 टक्के परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. आता या कंपनीने बोनस शेअर देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने त्यांना लॉटरी लागणार आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.