Multibagger Share : तीनच वर्षांत बांधला असता बंगला! 18 रुपयांच्या शेअरवर घेतली असती भरारी

Multibagger Share : तीनच वर्षांत या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना बंगला बांधता आला. 18 रुपयांच्या शेअरवर अनेक गुंतवणूकदारांनी मोठी झेप घेतली. या स्टॉकने अनेकांना मालामाल केले. त्यामुळे त्यांचे स्वप्न साकार झाले.

Multibagger Share : तीनच वर्षांत बांधला असता बंगला! 18 रुपयांच्या शेअरवर घेतली असती भरारी
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 5:42 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : शेअर बाजारात अनेक मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Stock) आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. पण एखाद्या मल्टिबॅगर शेअरमुळे अवघ्या तीनच वर्षांत गुंतवणूकदारांना बंगला बांधता येऊ शकतो का? पण या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा (Huge Return) दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांना भरारी घेता आली. 18 रुपयांच्या शेअरवर अनेक गुंतवणूकदारांनी मोठी झेप घेतली. या स्टॉकने अनेकांना मालामाल केले. अवघ्या तीनच वर्षांतच ही किमया साधता आली. त्यामुळे अनेक जणांना हर्षवायू झाला आहे.

शेअरची किंमत

Aditya Vision हा तो शेअर आहे. या शेअरने अनेकांचे नशीब पालटवले आहेत. या कंपनीच्या शेअरने गेल्या तीन वर्षांत जोरदार तेजी दिसून आली. ही लांब उडी अनेकांच्या कल्पनेपलिकडील आहे. कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 18 रुपये होती. पण आता हा शेअर 2000 रुपयांपेक्षा अधिक झाला आहे.

हे सुद्धा वाचा

मल्टिबॅगर शेअर

आदित्य व्हिझनच्या शेअरने कमी वेळेतच लांबचा पल्ला गाठला. या शेअरने बाजारात जोरदार प्रदर्शन केले. कोविडनंतर बिहारमधील या कंपनीने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. कंपनीच्या शेअरने गेल्या तीन वर्षांत जवळपास 12 हजार टक्के रिटर्न दिले.

कमाईवाला स्टॉक

गेल्या एका महिन्यात मॉडर्न मल्टि-ब्रँड कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीचा स्टॉक 35 टक्के परतावा दिला. तर गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहूनअधिकचा परतावा दिला. मल्टिबॅगर स्टॉक कोविड काळात विक्री झाली. त्यानंतर ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांचा मोठा फायदा झाला.

शेअरमध्ये तेजी

या मॅल्टिबॅगर स्टॉकने 2023 मध्ये पहिल्या तिमाहीत जोरदार कमाई केली. 11 मार्च 2020 रोजी या शेअरचा बाजार बंद होताना 18 रुपये भाव होता. 28 जुलै 2023 रोजी हा शेअर बाजार बंद होताना 2189.10 रुपयांवर होता. या शेअरचा सर्वकालीन उच्चांक 2465 रुपये होता. तर 52 आठवड्यांचा निच्चांकी भाव 879.50 रुपये होता.

अनेक जण करोडपती

या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर त्यांना बंगला बांधता आला असता. तीन वर्षांपूर्वी या शेअरचा भाव 18 रुपये होता. एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 5555 शेअर खरेदी करता आले असते. सध्या शेअरचा भाव 2190 रुपये आहे. त्याहिशोबाने आज या शेअरची किंमत 1,21,65,450 रुपये असती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.