AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share : सोमवारी दोन स्मॉल कॅप शेअर उघडतील नशीब, असा होईल गुंतवणूकदारांचा फायदा

Multibagger Share : सोमवारी हे दोन स्मॉल कॅप शेअर गुंतवणूकदारांना लॉटरी लावू शकतात. कमी कालावधीत जास्त रिटर्न मिळविण्यासाठी हे दोन शेअर फायदेशीर ठरु शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

Multibagger Share : सोमवारी दोन स्मॉल कॅप शेअर उघडतील नशीब, असा होईल गुंतवणूकदारांचा फायदा
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) जास्त फायदा मिळवायचा असेल तर भविष्यात घौडदौड करणाऱ्या शेअरचा शोध घ्यावा लागतो. त्यांच्या बाजारातील मापदंडावर अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मग त्यात गुंतवणूक करावी लागते. मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Stock) शोधण्यासाठी अशा शेअरची तांत्रिक बाजू चांगली तपासून घ्यावी लागते. असा स्टॉक हाती लागला तर कमी कालावधीत तुम्हाला मालामाल होता येते. तुम्हाला जोरदार परतावा मिळतो. Roto Pumps आणि Muffin Green Finance या दोन कंपन्या गुंतवणूकदारांना लवकरच मालामाल करतील, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवित आहेत.

स्मॉलकॅप शेअर गेल्या शुक्रवारी शेअर बाजारात घसरणीचे सत्र असताना या दोन्ही स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजीचे सत्र दिसून आले. रोटो पंप्स लिमिटेड प्रोगेसिव्ह कॅविटी पंप तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये अग्रेसर आहे.. Roto Pumps कंपनी विविध उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार, पंपिंग सोल्यूशन देते.

बोनस शेअर रोटो पंप्स कंपनी ही पंपिंग सोल्युशन कंपनीत एक अग्रगण्य नाव आहे. कंपनीने दर्जेदार पाईप्स आणि सेवेत नाव काढले आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शुक्रवारी 7 जुलै रोजी बोनस शेअर देण्याची रेकॉर्ड तारखेची घोषणा केली आहे. गुरुवारी 6 जुलै रोजी रोटो पंप्सचा शेअर 195 रुपयांपर्यंत वधारला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला.

हे सुद्धा वाचा

असा दिला परतावा गेल्या एका महिन्यात रोटो पंप्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने 14 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला आहे. गेल्या 6 महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना 73 टक्क्यांपर्यंत मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. तर एका वर्षात गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा दिला आहे. दोन वर्षांत रोटो पंप्सचे शेअर 300 टक्के तर 3 वर्षांत 750 टक्के रिटर्न दिले.

मुफिन ग्रीन फायनान्स मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड एक गुंतवणूक फर्म आहे. कंपनी इन्व्हेस्टमेंट एडव्हायझरी एसेट मॅनेजमेंट कॅपिटल प्रिझर्व्हेशन आणि फायनेन्शिअल प्लॅनिंग सारख्या सेवा देते. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने बोनस शेअर देण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास 770 कोटी रुपयांचे या कंपनीचे बाजारातील भांडवल आहे. मुफिन ग्रीनच्या शेअरने गेल्या एका वर्षांत गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीने 4 वर्षांत 1500 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 154 रुपये तर निच्चांक 49 रुपये आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.