Multibagger Stock | अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धघाटनापूर्वीच उघडले नशीब! या स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Stock | अयोध्येत राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक विकास कामे सुरु आहेत. अयोध्येसह अनेक धार्मिक स्थळावर टेंट सिटी उभारणाऱ्या कंपनीने कमाल केली आहे. या कंपनीचा स्टॉक अवघ्या वर्षभरात मल्टिबॅगर ठरला. एकाच वर्षात स्टॉक 250 रुपयांहून 750 रुपयांवर पोहचला.
नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : शेअर बाजारात कमाईची संधी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेक गुंतवणूकदार मल्टिबॅगर स्टॉकच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे उद्धघाटन होत आहे. या ठिकाणच्या विकास कामांना वेग आला आहे. अयोध्येत जगभरातून भाविक भक्त आणि परदेशी पर्यटकांची गर्दी असेल. त्यांच्या व्यवस्थेसाठी टेंट सिटीचे काम पण सुरु आहे. त्यातच धार्मिक स्थळी टेंट सिटी उभारणाऱ्या या कंपनीचे भाग्य उजळले आहे. या कंपनीचा शेअर एकाच वर्षात 250 रुपयांहून 750 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
शेअर तुफान तेजीत
धार्मिक स्थळी टेंट सिटी उभारण्याचे काम प्रवेग लिमिटेड (Praveg Ltd) करते. या कंपनीचा स्टॉक सध्या तेजीत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात होत आहे. अयोध्या आता जगाच्या नकाशावर आली आहे. या धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यादृष्टीने दळणवळणाच्या सुविधेसह अन्य अनेक विकास कामांना वेग आला आहे. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आणि धार्मिक पर्यटनाला गती देण्यासाठी अनेक योजना आखण्यात येत आहेत. त्याचा फायदा काही कंपन्यांना झाला आहे. प्रवेग लिमिटेड ही कंपनीत त्यातीलच एक आहे. या कंपनीचा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. एकाच वर्षात या स्टॉकने बंपर रिटर्न दिला आहे. राम मंदिराच्या उद्धघाटनापूर्वीच टेंट सिटी तयार करणाऱ्या या कंपनीचा स्टॉक तेजीत आहे.
टेंट सिटी अनेक शहरात
अनेक धार्मिक स्थळावर टेंट सिटी उभारण्याचे काम प्रवेग लिमिटेड (Praveg Ltd) करत आहे. या कंपनीचा शेअर पूर्वी 250 रुपयांवर ट्रेड करत होता. एकाच वर्षात तो 750 रुपयांच्या जवळपास पोहचला. या कंपनीने एकाच वर्षात गुंतवणूकदारांना तिप्पट नफा कमावून दिला. कंपनी सध्या अयोध्येत श्रीराम जन्म भूमीजवळ टेंट सिटी उभारत आहे. याशिवाय, वाराणसी काशी विश्वनाथ मंदिराजवळ, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ, कच्छच्या रणजवळ टेंट सिटी उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.
कंपनीला मिळाली नवीन ऑर्डर
कंपनीला लक्षद्वीपच्या पर्यटन विभागाने पण कार्यनिविदा दिली आहे. त्यातंर्गत या केंद्रशासित प्रदेशातील अगत्ती द्वीपमध्ये रेस्टॉरंट, क्लोकरुम, चेजिंग रुम आणि इतर सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे. इतरी अनेक कामे कंपनीला मिळाली आहे. हे काम तीन वर्षांसाठी आहे. ते पुढील दोन वर्षांसाठी वाढविण्यात येईल. कंपनीचे देशभरात 580 ऑपरेशनल रूम आहे.