Multibagger Stock Identify : कसा होऊ श्रीमंत, मल्टिबॅगर स्टॉक निवडू तरी कसा? हा आहे सोपा मार्ग

Multibagger Stock Identify : योग्य स्टॉकची निवड केली तर तुम्हाला पण जोरदार फायदा होऊ शकतो. पण हा मल्टिबॅगर स्टॉक निवडावा तरी कसा सवाल अनेकांना पडतो. त्यासाठी काही फॉर्म्युला आहे का, अशी विचारणा होते. तर या पद्धतीचा वापर केला तर मल्टिबॅगर स्टॉकची निवड करता येऊ शकते.

Multibagger Stock Identify : कसा होऊ श्रीमंत, मल्टिबॅगर स्टॉक निवडू तरी कसा? हा आहे सोपा मार्ग
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 5:27 PM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारातील कोणत्याही स्टॉकमध्ये 200, 400 , 4,000 टक्के परताव्याची बातमी वाचली की असा स्टॉक आपल्याकडे का नाही, असा सहज विचार येतो. अशा स्टॉकमध्ये उसळीनंतर गुंतवणूक करणे फायदेशीर ठरत नाही. कारण हा शेअर तोपर्यंत उच्चांकावर पोहचलेला असतो. त्यामुळे वेळीच मल्टिबॅगर स्टॉकची निवड कशी करायची असा सवाल शेअर बाजारात (Share Market) दाखल अनेक गुंतवणूकदारांना पडतो. योग्य स्टॉकची निवड करुन त्यात गुंतवणूकीची योग्य वेळ कशी निवडावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. गुंतवणूकीची योग्य वेळ कोणती, असा सवाल अनेकांना पडतो. मल्टिबॅगर स्टॉकची निवड (How To Identify Multibagger Stock) तरी कशी करावी, ज्यामुळे जोरदार नफा कमाविता येईल, असे अनेकांना वाटते.

काय आहे उपाय

तज्ज्ञांचे मते योग्य स्टॉक निवडीचे अनेक पर्याय आहेत. त्याआधारे तुम्ही शेअर बाजारात नफा कमाऊ शकता. पण मल्टिबॅगर स्टॉकची निवड करण्यासाठी काही नियम आहे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. मल्टिबॅगर स्टॉक ठरेल की नाही, यासाठी हे नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य शेअरची निवड करणे हा सर्वात चांगला उपाय आहे.  शेअर बाजाराचे तंत्र आत्मसात केले तर तुम्हाला झटपट श्रीमंत होता येते.  शेअर बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

हे सुद्धा वाचा

स्टॉकची निवड करण्याचा फॉर्म्युला

जर तुम्ही स्टॉकची निवड केली तर तुम्हाला योग्य रिटर्न हमखास मिळतो. तज्ज्ञांच्या मते, फॉर्म्युला 26 आधारे योग्य स्टॉकची निवड करता येईल. तुम्हाला वाटेल हा कोणता फॉर्म्युला आहे. त्याचा फायदा काय आहे. तर फॉर्म्युला 26 म्हणजे जो स्टॉक वार्षिक आधारावर 26 टक्के परतावा देतो, असा स्टॉक, तोच मल्टिबॅगर ठरु शकतो. हा स्टॉक तुम्हाला जास्त रिटर्न देण्याची शक्यता आहे. कंपनीचा अभ्यास पण करणे आवश्यक आहे. कंपनीला कोणती ऑर्डर मिळाली. तिची घौडदौड कशी आहे, हे तपासणे फायदेशीर ठरते.

सोप्या शब्दात घ्या जाणून

मल्टिबॅगर स्टॉक तुम्हाला दहा वर्षांत दहा पट, 20 वर्षांत 100 पट रिटर्न आणि 30 वर्षांत 1000 पट रिटर्न देतो. शेअरच्या कम्पाऊंड वार्षिक दरवाढीवर लक्ष ठेवले तर तुम्हाला त्या स्टॉकची प्रगती कशी होते, याचे गणित उमगेल. हा स्टॉक वार्षिक आधारावर कमीतकमी 26 टक्के रिटर्न देत असले तर अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. पण इतरही घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना डोळे झाकून करु नका. योग्य स्टॉक निवडीसाठी तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.