12 दिवसांत केलं मालामाल, कोणत्या शेअरनं केली कमाल? दामदुप्पट कामगिरी करणाऱ्या शेअरची खबरबात
वर्ष 2021 मध्ये कंपनीच्या शेअर्सने मोठ्या प्रमाणावर निराशा केली होती. मात्र, 2021 च्या शेवटी गुंतवणुकदारांना रिटर्नचे गिफ्ट देण्यास सुरुवात केली.
नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने शेअर्सने (Stocks) शेअरधारकांना मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक कमी लिक्विडिटी असणारे एक्स किंवा एक्सटी कॅटेगरची स्टॉक आहेत. केआयएफएस फायनान्शियल्स सर्व्हिसेस (KIFS Financial Services) स्टॉकने केवळ 12 सत्रांत शेअरधारकांचे पैसे दामदुप्पट केले आहेत. केआयएफएस स्टॉक 6 जानेवारी 2022 ला बीएसईवर 71.25 रुपये भावावर बंद झाला. 22 जानेवारीला 52 आठवड्यातील उच्चांकी 140.05 रुपयांचा टप्पा गाठला होता. या कंपनीच्या शेअरने केवळ 12 सेशनमध्ये शेअरधारकांचा पैसा दुप्पट केला आहे. दरम्यान, बीएसईने शेअर किंमत वाढीवर कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. शेअर किंमतीमधील वाढ केवळ संभाव्य अंदाजामुळे वाढले. केआयएफएस फायनान्शियल्स सर्व्हिसेस लिमिटेडने शेअर किंमतीमधील चढ-उतार हा कंपनीद्वारे देण्यात आलेल्या माहितीमुळे नाही.
शेअरला अप्पर सर्किट
आज (सोमवार) केआयएफएस फायनान्शियल्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. बीएसईवर 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 144.05 रुपयांवर पोहोचला. वर्ष 2021 मध्ये कंपनीच्या शेअर्सने मोठ्या प्रमाणावर निराशा केली होती. मात्र, 2021 च्या शेवटी गुंतवणुकदारांना रिटर्नचे गिफ्ट देण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात 5 सत्रात 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते.
एका महिन्यात 250 टक्क्यांनी वाढ
गेल्या आठवड्यात एनबीएफसीचा स्टॉक 115.25 रुपयांवरुन 140.05 वर पोहोचला. शेअरधारकांना 21.50 टक्के फायदा मिळाला. मागील एका महिन्यांत 39.95 रुपयांवरुन 140.05 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे 250 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. मल्टिबॅगर स्टॉकमुळे शेअरधारकांना 210 टक्के रिटर्न मिळाले. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ होऊन 151.51 कोटींवर पोहोचला.
मल्टीबॅगर रिटर्न ‘टॉप’ स्टॉक
गेल्या आठवड्यात केआयएफएस सोबत अन्य शेअर्सने गुंतवणुकदारांना अनपेक्षित रिटर्न दिले व अल्पकाळातच मालामाल केले. सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या (Multibagger Return) टॉप-5 मल्टिबॅगर शेअर्समध्ये सचेता मेटल्स लिमिटेड (Sacheta Metals Ltd.), एके स्पिनटेक्स लिमिडेट (AK Spintex Ltd.), केआईएफएस फायनान्शियल्स लिमिटेड (KIFS Financial Services Ltd.), नरेंद्र प्रॉपर्टीज लिमिडेट (Narendra Properties Ltd.) आणि ट्रानवे टेक्नॉलॉजी लिमिडेट (Tranway Technologies Ltd.) यांचा समावेश होतो.
मल्टिबॅगर स्टॉक म्हणजे काय?
मूळ किंमतीच्या अनेक पटींनी वाढ दर्शविणाऱ्या शेअर्सला मल्टिबॅगर स्टॉक म्हणतात. मल्टिबॅगर स्टॉक सुरुवातीला अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असतात. कंपनीमध्ये संभाव्य वाढीच्या शक्यतेने किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
इतर बातम्या
HDFC Bank FD : मुदत ठेवीवर चक्क खरेदी व्हाऊचर!, 7,500 रुपयांच्या एफडीवर मिळेल 7,500 रुपयांचे कुपन