Multibagger Stock : या पेनी स्टॉकने उघडले नशीब, गुंतवणूकदारांचा भांगडा

Multibagger Stock : शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी-50 इंडेक्सने तेजी दाखवली. बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स आणि बीएसी एफएमसीजी निर्देशांक टॉप गेनर ठरले. बाजारात 2,207 शेअरने चढाई केली तर 1,225 शेअरमध्ये घसरण दिसून आली.

Multibagger Stock : या पेनी स्टॉकने उघडले नशीब, गुंतवणूकदारांचा भांगडा
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 5:49 PM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : भारतीय बेंचमार्क निर्देशांकाने मूड चेंज केला. बाजार हिरव्या रंगाने न्हाऊन निघाला. काही सेक्टर्सने आज मोठी आघाडी घेतली. यामध्ये बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स (BSE Capital Goods Index) टॉप गेनर सेक्टर ठरले. तर बीएसई एफएमसीजी निर्देशांक (BSE FMCG Index) टॉप गेनर सेक्टर होते. आज बीएसई सेन्सेक्स 104 अंक वा 0.16% तेजीसह 65,983 अंकावर पोहचला. तर NSE निफ्टी-50 इंडेक्स 28 अंक वा 0.14% टक्क्यांच्या तेजीसह 19,640 अंकवर पोहचला. आज शेअर बाजारात या सेक्टरने मोठी कमाल केली. आज 2,207 शेअरने चढाई केली तर 1,225 शेअरमध्ये घसरण झाली. तर 165 शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही. यात काही पेनी स्टॉकने (Penny Stock) पण कमाल केली. त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरची किंमत हजारात नाही तर, हे शेअर अत्यंत स्वस्त आहेत.

या शेअरने केली कमाल

लार्सन टुब्रो लिमिटेड (Larsen Toubro Ltd), भारतीय स्टेट बँक (State Bank of India) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (HCL Technologies Ltd) यांनी आज आघाडी उघडली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (Hindustan Unilever Ltd), सन फार्मास्यूटिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Sun Pharmaceuticals Industries Ltd) आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (Ultratech Cement Ltd ) यांनी पण कमाल दाखवली. इतर सेक्टरमधील कंपन्यांनी पण कमाल केली. गुंतवणूकदारांना त्याचा फायदा झाला. त्यांना चांगला परतावा मिळाला. बीएसई मिड-कॅप निर्देशांक (BSE Mid-cap index ) 0.55% आणि बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांक ( BSE Small-cap index) 0.55% वधारला.

हे सुद्धा वाचा

318 लाख कोटींचे भांडवल

07 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्याचे बाजारातील भांडवल 318 लाख कोटी रुपयांवर पोहचले. 223 स्टॉक 52-आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचले. या शेअरमध्ये अपर सर्किट लागले. तर पेनी स्टॉकने मोठी कमाल केली. अगदी स्वस्तातील या स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. सन रिटेल लिमिटेड, नागार्जुन फर्टिलायझर आणि केमिकल लिमिटेड, युनिटेक लिमिटेड, विहान इंडस्ट्रीज, एमएसआर इंडिया या पेनी स्टॉकने जोरदार रिटर्न दिला. सन रिटेलच्या किंमतीत 9.09 टक्के तर इतर शेअरच्या किंमतीत 5 टक्के वाढ झाली.

मिड-स्मॉल कॅपची कमाल

मिड-कॅप गेनर्समध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Railway Finance Corporation Ltd ) आणि सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सॉल्यूशन्स लिमिटेड (CG Power and Industrial Solutions Ltd), तर स्मॉल-कॅप गेनर्समध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Ltd), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd) यांचा क्रमांक लागला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.