Multibagger Stock : 1 लाखाचे 57 कोटी! शेअर बाजारात लागली का हाती ही गुरुकिल्ली

Multibagger Stock : बाजारापेक्षा जोरदार कामगिरी करणारे काही स्टॉक आपल्या पोर्टफोलिओत असणे आवश्यक आहे. आता या शेअरनेच गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. छप्परफाड रिटर्न दिला. कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या 15 वर्षांत 41,000 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना दोनदा बोनस शेअर दिला आहे.

Multibagger Stock : 1 लाखाचे 57 कोटी! शेअर बाजारात लागली का हाती ही गुरुकिल्ली
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 6:47 PM

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजाराची (Share Market) बऱ्यापैकी माहिती असणे आवश्यक आहे. बाजारात एकदाच एकाच कंपनीचे भरमसाठ शेअर घेण्याची गरज नाही. पण निवडक स्टॉक मुबलक प्रमाणात नक्कीच हवे. मोठं-मोठ्या कंपन्यांचेच स्टॉक हवे, असा आग्रहपण गैर लागू ठरतो. कारण काही छुपे रुस्तम असे सूसाट सूटतात की, कमी कालावधीत, कमी गुंतवणुकीत मोठी मजल मारता येते. अशाच एका स्टॉकची ही छप्परफाड परताव्याची (Huge Return) कहाणी. या शेअरची किंमत गेल्या 15 वर्षांत 41,000 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना दोनदा बोनस शेअरचे गिफ्ट दिले आहे.

गुंतवणूकदार झाले कोट्याधीश

पीआय इंडस्ट्रीजच्या (PI Industries) शेअरने बम्पर उसळी घेतली आहे. हा शेअर 4 सप्टेंबर 2003 रोजी केवळ 59 पैशांवर व्यापार करत होता. तो आज 27 सप्टेंबर रोजी 3,445 रुपयांवर कारभार करत आहे. या शेअरमध्ये तुफान तेजी आली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2003 मध्ये या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक लॉक केली असती तर आज या शेअरचे मूल्य जवळपास 57 कोटी रुपये असते. गेल्या 15 वर्षांत 41,000 टक्क्यांहून अधिकची तुफानी बॅटिंग या शेअरने केली आहे.

हे सुद्धा वाचा

दोनदा बोनसची लॉटरी

पीआय इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना दोनदा बोनस शेअर्सचे गिफ्ट दिले आहे. कंपनीने मार्च 2009 मध्ये 1:1 प्रमाणात बोनस दिला. तर कंपनीने जुलै 2010 मध्ये 1:2 प्रमाणात बोनस दिला होता. एकूणच विचार करता गुंतवणूकदारांची Win Win Situation आहे. त्यांच्या हाती एक दमदार शेअर लागला आहे. ज्यांनी पूर्वीच डाव खेळला आहे. ते गुंतवणूकदार आता फायद्यात आहेत.

Apar Industries Share Price

इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इंडस्ट्रीशी ही कंपनी जोडलेली आहे. अपार इंडस्ट्री शेअरने ही कमाल केली. हा शेअर 3 रुपयांचा स्टॉक 5700 रुपयांवर पोहचला. अपार इंडस्ट्रीजचा शेअर 7 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 5850 रुपयांवर पोहचला. दरम्यान अपार इंडस्ट्रीज आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी निधी जमावण्यात येत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.