33.75 रुपयांच्या ‘या’ शेअरने बदलले गुंतवणूकदारांचे नशीब, 1 लाखाचे 11 महिन्यांत झाले 21 लाख
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एक्सप्रो इंडियाच्या शेअर्समध्ये प्रॉफिट-बुकिंगची प्रतीक्षा आहे, परंतु प्रॉफिट-बुकिंग संपल्यानंतर त्यात मोठी वाढ होऊ शकते. मल्टीबॅगर स्टॉकला 650 रुपये प्रति शेअर स्तरावर मजबूत सपोर्ट असल्याने त्यांनी गुंतवणूकदारांना खरेदीचे डाउनसाइड धोरण राखण्याचा सल्ला दिला.
नवी दिल्लीः Multibagger stock: भारतीय शेअर बाजाराने 2021 मध्ये नवा उच्चांक गाठलाय. बाजारातील विक्रमी रॅलीमुळे मोठ्या प्रमाणात समभागांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला. असाच एक स्टॉक पॉलिमर प्रोसेसिंग कंपनी Xpro India आहे, जिने 2021 मध्ये 2,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. एका वर्षात स्टॉकची किंमत 33.75 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढलीय. या वर्षाच्या सुरुवातीला जर एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 21 लाख रुपये झाली असती. इतका जबरदस्त परतावा इतर कोणत्याही गुंतवणूक साधनामध्ये क्वचितच आढळू शकतो. उत्कृष्ट परतावा देऊनही शेअर बाजारातील तज्ज्ञ अजूनही मल्टीबॅगर स्टॉकवर तेजीत आहेत. Xpro इंडियाच्या शेअरच्या किमतीत झालेली कोणतीही घसरण ही खरेदीची संधी म्हणून पाहिली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
गुंतवणूकदारांना खरेदीचे डाउनसाइड धोरण राखण्याचा सल्ला
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एक्सप्रो इंडियाच्या शेअर्समध्ये प्रॉफिट-बुकिंगची प्रतीक्षा आहे, परंतु प्रॉफिट-बुकिंग संपल्यानंतर त्यात मोठी वाढ होऊ शकते. मल्टीबॅगर स्टॉकला 650 रुपये प्रति शेअर स्तरावर मजबूत सपोर्ट असल्याने त्यांनी गुंतवणूकदारांना खरेदीचे डाउनसाइड धोरण राखण्याचा सल्ला दिला.
6 महिन्यांत 500% परतावा
गेल्या एका महिन्यात या समभागाने गुंतवणूकदारांना ८ टक्के परतावा दिला. गेल्या एका महिन्यात हा शेअर 669 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढला. त्याचप्रमाणे Xpro इंडियाच्या शेअरची किंमत गेल्या 6 महिन्यांत 118.70 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत 500 टक्क्यांहून अधिक उसळी नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे Xpro इंडियाच्या शेअरची किंमत वार्षिक आधारावर 33.75 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढली. या दरम्यान ते 21.38 पटींनी वाढले.
1 लाखाचे झाले 21 लाखांहून अधिक
जर गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये महिन्याभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 1.08 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने Xpro इंडियाच्या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याची रक्कम 6 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 21.38 लाख रुपयांपर्यंत गेली असती. संबंधित बातम्या
पोस्ट बँकेतून मिळतोय अधिक चांगला परतावा; ‘या’ दोन योजना ठरतायेत फायदेशीर
1st Audit Day: देशात NPA का वाढले? पंतप्रधान मोदींचे आधीच्या काँग्रेस सरकारकडे बोट