Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock | शंभर नंबरी कलदार! तीन वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock | SG Mart कंपनीचा शेअर 1 जानेवारी 2021 रोजी अवघ्या 94 रुपयांवर होता. पण त्यानंतर या शेअरने काही मागे पाहिले नाही. या शेअरने बुलेट ट्रेन प्रमाणे जोरदार मुसंडी मारली. या शेअरने तीनच वर्षांत एक लाखांचे कोट्यवधी रुपये केले. एक लाख रुपये गुंतवणूक करणारे कोट्याधीश झाले.

Multibagger Stock | शंभर नंबरी कलदार! तीन वर्षांत गुंतवणूकदार मालामाल
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 3:04 PM

नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : शेअर बाजारात हा शेअर बुलेट ट्रेनपेक्षा पण जलद धावला. बाजारात ज्यांनी जोखीम घेतली ते कोट्याधीश झाले. शेअर बाजार हा जोखीमेचा व्यवसाय मानण्यात येतो. पण या शेअरने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदार मालमाल झाले. या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आणि अल्पकालीन गुंतवणूकदारांना कमाईदार केले. एक लाखांचे या शेअरने कोट्याधीश केले. हा शेअर मल्टिबॅगर ठरला. एसजी मार्ट लिमिटेडचा स्टॉकने (SG Mart Ltd Stock) गुंतवणूकदारांना तीनच वर्षांत कोट्याधीश केले.

12000 टक्क्यांहून अधिक रिटर्न

पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा संबंधीच्या व्यवसाय असलेल्या या स्मॉलकॅप कंपनीने ही कमाल केली. एसजी मार्टच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गेल्या पाच व्यापारी सत्रात या शेअरला अप्पर सर्किट लागले. SG Mart Ltd चा शेअर कमी कालावधीत मल्टिबॅगर ठरला. या शेअरची किंमत अवघ्या तीन वर्षांतच 95 रुपयांहून 11,000 रुपयांवर पोहचली. तीन वर्षांत या शेअरने 12,000 रुपयांचा परतावा दिला.

हे सुद्धा वाचा

1 लाखांचे झाले 1 कोटींहून अधिक

SG Mart Ltd चा शेअर तीन वर्षांतच रॉकेट ठरला. 1 जानेवारी 2021 रोजी हा शेअर अवघ्या 94 रुपयांवर होता. शुक्रवारी, 12 जानेवारी 2024 रोजी हा शेअर 11,371 रुपयांवर पोहचला. जर तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाखांची गुंतवणूक केली असती आणि हे शेअर विक्री केले नसते. तर आज गुंतवणूकदारांना 1.2 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा मिळाला असता. लखपती तीन वर्षातच करोडपती झाले असते.

शुक्रवारी सर्वकालीन उच्चांकावर

या शुक्रवारी या शेअरने कमाल केली. हा स्टॉक सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. या कंपनीचे बाजारातील भांडवल 6340 कोटी रुपये झाले. हा शेअर 11,371 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. केवळ दीर्घकालीनच नाही तर अल्पकालीन गुंतवणूकदारांना पण या शेअरने मालामाल केले. सहा महिन्यात या शेअरने 400.56 टक्के, एका महिन्यात 42.30 टक्के रिटर्न दिला. गेल्या पाच दिवसांपासून या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.