घसरत्या बाजारात या शेअरने केले मालामाल; एका वर्षात 1 लाखांचे केले 39 लाख
Multibagger Stock : या स्टॉकने वर्षभरात 1 लाखांचे 39 लाख केले. बाजारात अनेक दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरू होते. पण या स्टॉकवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हा स्टॉक अजून निखरला. तो वधारला. त्याने मोठी झेप घेतली. गुंतवणूकदार मालामाल केले.

शेअर बाजारातील या चमकत्या ताऱ्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. गेल्या वर्षभरापासून शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना कायम हात दाखवला आहे. कधीतरी तेजीचे सत्र आले. कोट्यवधी गुंतवणूकदारांचे अब्जावधींचे नुकसान झाले. पण घसरत्या बाजारात या स्टॉकने गुंतवणूकदारांचा भरोसा कायम ठेवला. या स्टॉकवर बाजाराच्या घसरणीचा कोणताच परिणाम झाला नाही. हा स्टॉक वेळेनुसार रॉकेट ठरला. या स्टॉकने वर्षभरात गुंतवणूकदाराना मल्टिबॅगर रिटर्न दिला. या स्टॉकने वर्षभरात 1 लाखांचे 39 लाख केले.
RRP सेमीकंडक्टरची मोठी झेप
RRP सेमीकंडक्टर शेअरने ही कमाल केली आहे. या स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी कोणी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याची किंमत 39 लाख रुपये इतकी झाली असती. या एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 305 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. एका वर्षात या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना 3835 टक्क्यांचा फायदा झाला आहे.




या स्टॉकचा रोज नवीन रेकॉर्ड
17 एप्रिल रोजी NSE वर आरआरपी सेमीकंडक्टर शेअरने 52 आठवड्यातील नवीन रेकॉर्ड गाठला. प्रत्येक दिवशी या स्टॉकने नवीन रेकॉर्ड केला. शेअरमधील मोठ्या उसळीने कंपनीचे बाजारातील मार्केट कॅप 1000 कोटींच्या पुढे गेले. गेल्या सहा महिन्यात या शेअरने 944 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
17 रुपयांहून थेट 752 रुपयांवर शेअर
आरआरपी सेमीकंडक्टरच्या शेअरची किंमत एका वर्षापूर्वी केवळ 17.35 रुपये होती. ती आता 752.55 रुपये इतकी झाली आहे. एका वर्षात या स्टॉकने 3835 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षांपूर्वी या शेअरमध्ये जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 39 लाख रुपये झाली असती. जर एखाद्याने या स्टॉकमध्ये 25,000 रुपये गुंतवणूक केली असती तर या गुंतवणुकीवर 11 लाखांचा परतावा मिळाला असता. ऑक्टोबर-डिसेंबर 2024 मधील तिमाहीत या कंपनीचा महसूल 14.82 कोटी रुपये होता. तर कंपनीला 6.56 कोटींचा निव्वळ नफा झाला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.