Multibagger Stock : या शेअरची दमदार बॅटिंग, गुंतवणूकदारांचा खिसा झाला गरम

Multibagger Stock : या शेअरने तुफान बॅटिंग केली आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. एकाच वर्षात हा शेअर 150 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे अनेकांना लॉटरी लागली. त्यांना कमाईची मोठी संधी साधता आली.

Multibagger Stock : या शेअरची दमदार बॅटिंग, गुंतवणूकदारांचा खिसा झाला गरम
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : आज सकाळी शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड झाली. पण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराने अनेक रेकॉर्ड केले. शेअर बाजार परदेशी गुंतवणूकदारांच्या हिंदोळ्यावर मोठी झेप घेत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी लवकरच नवीन झेंडा गाडतील, असा विश्वास सर्वांनाच आहे. भारतात जागतिक ब्रँड येऊ घातले आहे. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वारे आहे. शेअर बाजाराने गेल्या काही वर्षात भरभरुन दिले आहे. काही छुप्या खेळाडूंनी गुंतवणूकदारांना तुफान कमाई करुन दिली. गुंतवणूकदार अल्पावधीतच करोडपती झाले. तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. या मल्टिबॅगर शेअरने (Multibagger Stock) तुफान बॅटिंग केली आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. एकाच वर्षात हा शेअर 150 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे अनेकांना लॉटरी लागली.

मल्टिबॅगर स्टॉक

श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Schneider Electric Infrastructure) या शेअरने गेल्या एका वर्षांत गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली. हा स्टॉक मल्टिबॅगर ठरला. या शेअरने तुफान बॅटिंग केली.

हे सुद्धा वाचा

कशी होती कामगिरी

या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 6,850 कोटींचे आहे. गेल्या एक वर्षांपासून हा शेअर रॉकेट ठरला आहे. या हप्त्यात या शेअरने 308 रुपयांची चढण चढली. या शेअरच्या 52 आठवड्यातील हा उच्चांक आहे. गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली.

मोठी मिळाली ऑर्डर

या स्टॉकचा 52-आठवड्यातील उच्चांकी स्तर 308 रुपये आणि 52-आठवड्यातील निच्चांकी स्तर 105.40 रुपये आहे. 31 मार्च 2023 रोजीपर्यंत या कंपनीकडे 1,073 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे.

159 टक्के दरवाढ

या कंपनीचा शेअर 18 जुलै 2022 रोजी 108.20 रुपयांवर होता. त्यात वाढ झाली. 18 जुलै 2023 रोजी हा शेअर 297 रुपयांवर पोहचला. एकाच वर्षात या शेअरने जवळपास 159 टक्क्यांची वाढ केली. एका वर्षापूर्वी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 2.59 लाख रुपये झाले असते.

JFSL वर कमाईचा डाव

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली. हा शेअर सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान बाजारात सूचीबद्ध होईल. त्यामुळे JFSL वर कमाईचा डाव साधता येईल.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून आवश्य सल्ला घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.