145 टक्क्यांचा घसघशीत परतावा, सचेता मेटलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, मल्टी बॅगर शेअरकडे दमदार वाटचाल

पेनी शेअर असणाऱ्या सचेता मेटल्सने गुंतवणूकदारांना 15 दिवसांत मालामाल केले. चेतना मेटल्सच्या शेअरची किंमत 19.55  रुपयांवरून थेट 47.55  रुपये प्रति शेअर अशी वेगवान झाली. यामुळे त्याच्या भागधारकांना नवीन वर्षात सुमारे 145 टक्क्यांचा अमाप परतावा मिळाला. 15 दिवसांत जुन्या वर्षातून नवीन वर्षात या शेअरचे सुरवंटीचे  फुलपाखरू झाले. आता ते उडते की... येणार काळच ठरवेल.

145 टक्क्यांचा घसघशीत परतावा, सचेता मेटलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, मल्टी बॅगर शेअरकडे दमदार वाटचाल
मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 4:28 PM

मुंबई : शेअर बाजारात पेनी शेअरवर पैसा लावणे म्हणजे जुगार खेळणे अस समज प्रचलित आहे. शेअर बाजार जेवढा जोखमीचा त्याहून अधिक पेनी शेअरमधील गुंतवणूक धोक्याची मानली जाते. परंतु या पेनी शेअरमधूनच मार्केटचे काही दमदार खेळाडू निपजतात. जे कमाईच्या करिष्माई आकड्यांना अलगद धोबीपछाड देऊन गुंतवणूकदारांना मालामाल करतात. सचेता मेटल्सचे (Sachets Metals) शेअर्स त्यापैकी एक आहेत. सचेता मेटल्सच्या शेअरची किंमत 19.55 रुपयांवरून 47.55 रुपये प्रति शेअर झाली आहे.  शेअर बाजाराने (Share Market)  2022 या नवीन वर्षात दमदार मुसंडी मारली आहे. 30 शेअर्सच्या बीएसई बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्सने (BSE Benchmark Index Sensex) 61,000 अंशांचा टप्पा सहजरीत्या पार केला आहे. शेअर बाजार तज्ज्ञ नवीन वर्षात मल्टिबॅगर स्टॉक्सची (multibaggar Stocks) शिफारस करण्यात व्यस्त असले, तरी काही पेनी स्टॉक्सने (Penny stocks) मल्टीबॅगर स्टॉक्सच्या यादीत चंचूप्रवेश केला आहे. सचेता मेटल्सचे  शेअर्स त्यापैकी एक आहेत. चेतना मेटल्सच्या शेअरची किंमत 19.55  रुपयांवरून 47.55  रुपये प्रति शेअर झाली आहे. म्हणजेच या शेअरचे गुंतवणूकदारांना या नवीन वर्षात सुमारे 145 टक्के परतावा दिला आहे.

सचेता मेटल्स स्कॉटच्या गेल्या काही महिन्यांतील  किंमतीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की,  गेल्या महिन्याभरापासून पेनी स्टॉक्स तेजीच्या ट्रेंडवर आहेत. अर्थात तिच्या या कर्तृत्वाचा जेवढा हेवा वाटला तेवढेच संशयाचे धुके दाटले. भारतीय एक्सचेंजने कंपनीकडे  किंमतीच्या या वेगवान आलेखाबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. कंपनीने मेटल उत्पादनात अर्थात साठ्यात वाढ झाल्याने तेजीची कारणमीमांसा केली.

अचानक कंपनीचा स्टॉक वधारला

सचेता मेटल्सच्या शेअरच्या किंमतीत अचानक झालेल्या वाढीवर कंपनीने प्रतिक्रिया दिली की, कंपनीच्या शेअर च्या किंमतीतील चढउतार प्रामुख्याने बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. बाजारातील तरलता त्यासाठी कारणीभूत आहे., असे लाइव्ह मिंटने यासंबंधीच्या वृतात म्हटले आहे. शेअरच्या चढ उताराशी कंपनीचा कुठलाही हितसंबंध नाही अथवा व्यवस्थापन त्यात हस्तक्षेप करत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

10 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्स 100% पेक्षा जास्त वधारले

31 डिसेंबर 2021 रोजी बीएसईवर सचेता मेटल्सचे समभाग 19.55 रुपयांवर बंद झाले, तर बीएसईवर 14 जानेवारी 2022 रोजी ते 47.55 रुपयांवर बंद झाले. अशा प्रकारे 2022 मध्ये हा मल्टिबॅगर पेनी स्टॉक जवळजवळ 145 टक्क्यांनी वाढला.

गेल्या आठवड्यात सचेता मेटल्सच्या शेअर्सने सर्व 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये 5 टक्के वरील सर्किट साधले असून, या कालावधीत भागधारकांना सुमारे 21.50 टक्के परतावा मिळाला आहे.गेल्या महिन्याभरात हा मल्टिबॅगर पेनी स्टॉक 16.95 रुपयांनी वाढून 47.55 रुपयांवर पोहोचला. या काळात त्यात 180 टक्क्यांची वाढ झाली आहे.

विदेशी गुंतवणुकदारांची हातघाईची लढाई संपली

गेल्या तीन वर्षांत कोरोनाची लाट असतानाही  भारतीय शेअर बाजारात स्टॉक्सनी जोरदार बॅटिंग केली आहे. कोरानाच्या भारतातील रौद्र रुपाने हापकी खाललेल्या विदेशी गुंतवणुकदारांनी  (FPI)हातघाईची लढाई सुरू केली होती. मात्र बाजारात तेजी परतताच, विदेशी गुंतवणुकदार कमाईच्या आशेला लागले आहेत. त्यांनी आतापर्यंत जानेवारीत भारतीय बाजारपेठेत 3,117 कोटी रुपये ठेवले आहेत. 1 ते 14 जानेवारी दरम्यान शेअर्समध्ये 1,857 कोटी रुपये आणि हायब्रिड उत्पादनांमध्ये 1,743  कोटींची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 पासून सलग 3 महिने त्यांनी भारतीय बाजारात निव्वळ विक्री केली होती.

संबंधित बातम्या :

क्रेडिट कार्डवरील बचतच तुमची कमाई! कॅशबॅक, रिवॉर्डस्, डिस्काउंटच्या माध्यमातून बचत

Credit Card : खरंच एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डचा फायदा होतो, खिशाला ओझे की फायदेशीर सौदा

RailwayBudget | शंभरी पूर्ण करण्याआधीच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प का गुंडाळला ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.