MUTUAL FUND: बचतीसोबत कर्जसुविधा, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा डबल धमाका, एका क्लिकवर कर्ज

इक्विटी आणि डेब्ट गुंतवणुकीच्या विविध म्युच्युअल फंड स्कीमवर लोन मिळू शकते. म्युच्युअल फंड वर लोनची सुविधा पूर्वीपासूनच उपलब्ध आहे.

MUTUAL FUND: बचतीसोबत कर्जसुविधा, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा डबल धमाका, एका क्लिकवर कर्ज
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 11:52 PM

नवी दिल्ली : म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करण्याकडे अलीकडच्या काळात कल वाढीस लागला आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचे अधिकाधिक फायदे आहेत. मात्र, सर्वात मोठा फायदा म्हणजे म्युच्युअल फंडद्वारे कर्जाचा पर्याय उपलब्ध असतो. 50 हजार ते 3 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज म्युच्युअल फंड युनिटवर उपलब्ध होते. इक्विटी आणि डेब्ट गुंतवणुकीच्या विविध म्युच्युअल फंड स्कीमवर लोन मिळू शकते. म्युच्युअल फंड वर लोनची सुविधा पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. अनेक बँका आणि एनबीएफसी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या रकमेवर कर्ज उपलब्ध करते. विशेष म्हणजे म्युच्युअल फंडवर कर्जाची प्रक्रिया (Mutual Fund Loan Process) अत्यंत सुलभ आहे.

लोन प्रक्रिया

म्युच्युअल फंड युनिटवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँक किंवा एनबीएफसीकडे कर्जाचा करार करावा लागेल. याद्वारे तुमचे म्युच्युअल फंड युनिट गहाण ठेवले जाते. बँक किंवा एनबीएफसी यासापेक्ष तुम्हाला लोन प्रदान करते. युनिटच्या बाजार मूल्याच्या आधारावर लोन मंजूर केले जाते.

सुलभ लोन

म्युच्युअल फंडवर उपलब्ध लोन ओवरड्राफ्ट सुविधेच्या स्वरुपात मिळते. निकडीच्या वेळी गुंतवणुकदार अॅपच्या माध्यमातून आवश्यक लोन रक्कम प्राप्त करू शकतात. लोनसाठीचा अर्ज केल्याबरोबरच गुंतवणुकदाराच्या बँक खात्यात रक्कम थेट वर्ग केली जाते. तुम्हाला यासाठी अॅप अँड्रॉईड स्टोअर किंवा आयओएस अॅप स्टोअर वर उपलब्ध असेल.

म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याद्वारे गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्मिती, नियमित उत्पन्न प्राप्ती इ. उदिष्टे निश्चितपणे साध्य करू शकतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे

  1. म्युच्युअल फंडातील भांडवल इक्विटी शेअर्स /बाँड्स मध्ये गुंतवले जाते. यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम घटते.
  2. विशिष्ट अपवाद वगळता म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही विद्ड्रॉल केली जाऊ शकते. यामध्ये गुंतवणूकदाराला तत्कालीन दिवसाच्या युनिटच्या दरानुसार रक्कम मिळते.
  3. फंड मॅनेजरकडे गुंतवणुकीच्या पर्यायाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ असतात. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारापेक्षा फंड मॅनेजर अधिक चांगल्या पद्धतीने भांडवलाची गुंतवूक करू शकतात.
  4. म्युच्युअल फंड मधील गुंतवणुक तुलनेने सुरक्षित मानली जाते. सरकारी संस्थाद्वारे गुंतवणूक व्यवहार नियंत्रित केले जातात. सेबीचं विशेष नियमन म्युच्युअल फंडावर असते.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.