नारायण मूर्ती यांनी चार महिन्यांच्या नातवाला भेट दिले 15 लाख शेअर, त्याची किंमत…
narayan-murthy: नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये इन्फोसिस कंपनीची स्थापना केली होती. तेव्हापासून 2002 पर्यंत ते कंपनीचे CEO होते. त्यानंतर 2002 पासून 2006 पर्यंत बोर्डाचे चेअरमन होते. त्यानंतर 2011 मध्ये ते निवृत्त झाले होते.
नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती नेहमी आपल्या आगळ्यावेगळ्या कामांमुळे चर्चेत असतात. त्यांनी दिलेले सल्ले लाखो तरुण ऐकत असतात. आता नारायण मूर्ती यांनी आपल्या नातवासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी चार महिन्यांच्या नातवाला 15 लाख शेअर गिफ्ट दिले आहेत. त्याची किंमत 240 कोटी रुपये आहे. हे शेअर कंपनीत 0.04% आहे. हे शेअर गिफ्ट केल्यानंतर इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती यांची भागेदारी 0.40% वरुन 0.36 % राहिली आहे.
रोहन अन् अपर्णाचा मुलगा
नारायण मूर्ती यांनी 10 नोव्हेंबर रोजी नातू झाला. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन आणि अपर्णा आई-बाबा झाले. नारायण मूर्ती यांनी नातवाचे नाव संस्कृत शब्द अटूटपासून प्रेरित होऊन ठेवले. त्यांनी नातवाचे नाव एकाग्र ठेवले.
नारायण मूर्ती यांच्या मुलीस दोन मुली
एकाग्र यांच्यापूर्वी नारायण मूर्ती आजोबा बनले आहे. त्यांची मुलगी अक्षता आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत. त्यांची नावे कृष्णा सुनक आणि अनुष्का सुनक आहेत. ऋषी सूनक काही महिन्यांपूर्वी परिवारासह भारत दौऱ्यावर आले होते. तसेच नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती काही दिवसांपूर्वी खासदार झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांची खासदार म्हणून नियुक्त करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
1981 मध्ये इंन्फोसिसची स्थापना
नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये इन्फोसिस कंपनीची स्थापना केली होती. तेव्हापासून 2002 पर्यंत ते कंपनीचे CEO होते. त्यानंतर 2002 पासून 2006 पर्यंत बोर्डाचे चेअरमन होते. त्यानंतर 2011 मध्ये ते निवृत्त झाले होते. परंतु 2013 मध्ये एग्झिक्यूटीव्ह चेअरमन म्हणून ते परत आले. या दरम्यान त्यांचा मुलगा रोहन त्यांचा एग्झिक्यूटीव्ह असिस्टंट म्हणून काम करत होता.