‘एआय’ मुळे नोकऱ्या जाणार का? नारायण मूर्ती यांनी सांगितले नेमका कसा होणार परिणाम
narayana murthy on Artificial Intelligence: एआयमुळे नोकऱ्या जाणाऱ्या असल्याची भीती जास्त प्रमाणात व्यक्त केली जात आहे. परंतु एआय नोकऱ्या कशा पद्धतीने बदलून देणार, त्यावर चर्चा होत नाही. एआयचे स्वागत केले पाहिजे. त्याचा एक चांगला टूल म्हणून वापर केला पाहिजे.
एआईचा (Artificial Intelligence) वापर संपूर्ण जगात वाढत आहे. जगभरातील अनेक कंपन्यांनी एआयचा वापर सुरु केला आहे. एआय आल्यामुळे अनेक कामे सोपी होत आहेत. परंतु ज्या पद्धतीने एआयचा वापर वाढत आहे, ते पाहिल्यावर भविष्यात एआयमुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर आता इन्फोसिस कंपनीचे फाउंडर एन.आर. नारायणमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले नारायणमूर्ती
नारायणमूर्ती म्हणाले की, मानवाची बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा कोणीच सामना करु शकत नाही. त्यासाठी त्यांनी 1975 मधील तंत्रज्ञान ‘केस टूल्स’ चे उदाहरण दिले. त्यावेळी सॉफ्टवेयर डेव्हलेपमेंटमुळे नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु प्रकार उलटाच घडला. त्यानंतर रोजगाराच्या अनेक संधी आल्या.
एआयमुळे नोकऱ्या जाणाऱ्या असल्याची भीती जास्त प्रमाणात व्यक्त केली जात आहे. परंतु एआय नोकऱ्या कशा पद्धतीने बदलून देणार, त्यावर चर्चा होत नाही. एआयचे स्वागत केले पाहिजे. त्याचा एक चांगला टूल म्हणून वापर केला पाहिजे. सर्वसाधारणपणे तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल आणि विशेषतः AI च्या भूमिकेबद्दल पुरेसा मी आशावाद आहे. तथापि, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण AI ला उपयुक्त साधन बनवण्याचा प्रयत्न करु. मानवी बुद्धी हिच सर्वश्रेष्ठ आहे. मी औद्योगिक क्षेत्रात एआयच्या वापराबाबत अधिक आशावादी आहे, असे त्यांनी म्हटले.
नोकऱ्या जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
नारायण मूर्ती यांनी एआयने नोकऱ्या जाण्याच्या चर्चा त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्या. यापूर्वी त्यांनी त्या चर्चांना उत्तर दिले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या स्थापना दिनाप्रसंगी बोलताना एआयमुळे जीवन आरामदायी बनणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच मानव कधीच तंत्रज्ञानाला आपल्यावर वरचढ होऊ देणार नाही. मानवी मन तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे आहे, असे त्यांनी म्हटले होते.