AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या बँकेचे नारी शक्ती बचत खाते, विम्यासह मिळणार हे फायदे

Nari Shakti Saving Account | नारी शक्ती बचत खाते महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी फायदेशीर ठरु शकते. या खात्यात महिन्याला अनेक फायदे मिळतील. एक कोटी रुपयांपर्यंत अपघात संरक्षण मिळेल. प्रक्रिया शुल्कावर सवलत आणि स्वस्त आरोग्य विमा, कमी व्याजदरावर कर्जाची सुविधा अशा अनेक सेवा, सुविधा या बचत खात्यातून मिळतील.

या बँकेचे नारी शक्ती बचत खाते, विम्यासह मिळणार हे फायदे
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 3:41 PM

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : बँक ऑफ इंडियाने नारी शक्ती नावाने महिलांसाठी खास बचत खात्याचा श्रीगणेशा केला आहे. हे बचत खाते विशेष रुपाने 18 वर्ष आणि त्यावरील अधिक वयाच्या महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यांच्यासाठी ही खास सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक अपघात संरक्षण, स्वस्त आरोग्य विमा, लॉकर सुविदा, फ्री क्रेडिट कार्ड, कर्जावरील प्रक्रिया शुल्कात सवलत आदींचा समावेश करण्यात आला आहे. अजून काय काय आहेत या खात्याचा फायदा, जाणून घ्या…

नारी शक्ती बचत खात्याचा फायदा

  • अपघाती विमा संरक्षण – या खात्यात महिलांना एक कोटी रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण मिळते.
  • स्वस्त आरोग्य विमा – नारी शक्ती बचत खाते सुरु करणाऱ्या महिलांना आरोग्य विमा आणि वेलनेस प्रोडक्टवर सवलत देण्यात येणार आहे.
  • लॉकर सुविधेवर सवलत – गोल्ड आणि डायमंड बचत बँक खातेधारकांना लॉकर सुविधांवर सवलत देण्यात येणार आहे.
  • कर्जावर स्वस्त व्याजदर – नारी शक्ती बचत खात्यातील महिलांना देण्यात येणाऱ्या कर्जावर जादा दराने व्याज आकारण्यात येणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामासाठी जादा व्याज मोजावे लागणार नाही.
  • कर्ज प्रक्रियेवरील शुल्कात सवलत – नारी शक्ती बचत खात्यातील महिलांना कर्जासाठी प्रक्रिया शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी खर्च, कमी व्याजात कर्ज सुविधेचा फायदा घेता येईल.
  • फ्री क्रेडिट कार्ड – नारी शक्ती बचत खातेधारक महिलांना बँक फ्री क्रेडिट कार्डची सुविधा देणार आहे.

हा तर जम्बो पॅक

हे सुद्धा वाचा

नारी शक्ती बचत खाते केवळ एक नियमीत बचत खाते नाही. हे एक फायनेन्शिअल टूल आहे. त्यामुळे नोकरदार महिलांना, व्यावसायिक महिलांना त्याचा मोठा फायदा होईल. अतिरिक्त कमाईतून अधिक उत्पन्न मिळवता येईल. अनेक सोयी-सुविधा मिळतील. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल.

असे उघडा खाते

डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या हे खाते उघडता येईल. त्यासाठी काही कागदपत्रांची मात्र पूर्तता करावी लागणार आहे. तुम्हाला नारी शक्ती बचत खाते उघडायचे असेल तर बँक ऑफ इंडियाच्या 5132 च्या शाखा देशभर पसरल्या आहेत, या शाखेत तुम्हाला बचत खाते उघडता येईल.

पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.