महिलासांठी विशेष ! कोर्स करा आणि लाखो कमवा, महिलांना यशस्वी उद्योजिका बनवण्यासाठी ‘या’ सरकारी बँकेकडून ट्रेनिंग

राष्ट्रीय महिला आयोगाने बँक ऑफ बडोदाच्या मदतीने महिलांसाठी विशेष कोर्स आणला आहे. महिलांना सक्षम करणे हेच यामागील ध्येय आहे (National commission for women organizes training course for women).

महिलासांठी विशेष ! कोर्स करा आणि लाखो कमवा, महिलांना यशस्वी उद्योजिका बनवण्यासाठी 'या' सरकारी बँकेकडून ट्रेनिंग
राष्ट्रीय महिला आयोगाने बँक ऑफ बडोदाच्या मदतीने महिलांसाठी विशेष कोर्स आणला आहे
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 8:34 PM

नवी दिल्ली : महिला या आजच्या काळात सक्षम आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, असं अनेकजण भाषणात बोलतात. मात्र, तरीही ग्राउंड लेव्हलवर महिला या खरंच सक्षम आहेत का? हे शोधणं जास्त गरजेचं आहे. विशेष म्हणजे महिला सक्षम आहेत का ते फक्त न बघता त्यांना सक्षम करण्यासाठी काहीतरी मोहिम राबविणं जास्त जरुरीचं आहे. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने बँक ऑफ बडोदाच्या मदतीने महिलांसाठी विशेष कोर्स आणला आहे. महिलांना सक्षम करणे हेच यामागील ध्येय आहे (National commission for women organizes training course for women).

सहा आठवड्यांचा कोर्स

राष्ट्रीय महिला आयोग बँक ऑफ बडोदाच्या मदतीने महिलासांठी एक विशेष ट्रेनिंग कोर्स आयोजित केला आहे. हा कोर्स सहा आठवड्यांचा असणार आहे. महिलांना सक्षम करणं हाच या कोर्समागील हेतू आहे. महिला आयोगाने पहिल्यांदाच अशाप्रकारचा कोर्स आयोजित केलेला नाही. याआधीदेखील महिला आयोगाने वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने कोर्स आयोजित केले आहेत.

कोर्ससाठी काय निकष आहेत?

संबंधित कोर्ससाठी नोंदणीची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे, असं बँक ऑफ बडोदाकडून सांगण्यात आलं आहे. हा कोर्स पूर्णपणे स्पॉन्सर्ड आहे. या कोर्ससाठी अर्ज करायचा असेल तर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवं. याशिवाय उमेदवाराचं शिक्षण 12 पास असलं पाहिजे. या कोर्ससाठी आयआयएम बंगळुरु आणि इंडिया एसएमई फोरमकडून मदत केली जात आहे. आयआयएमचे प्राध्यापक महिलांना यशस्वी उद्योजिका बणण्यासाठी कशाप्रकारे कामं केलं पाहिजे आणि कोणत्या युक्त्या अवलंबल्या पाहिजेत, याबाबत शिकवतील. प्रत्येक तरुण महिला उद्योजिकेला आर्थिक स्वातंत्र्य देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे, असं बँक, ऑफ बडोदाकडून सांगण्यात आलंय.

बँक ऑफ बडोदाची महिलांसाठी विशेष योजना

बँक ऑफ बडोदाने याआधी देखील महिलांसाठी महत्त्वपूर्ण मोहिम राबवल्या आहेत. बँकेकडून महिला शक्ती सेव्हिंग स्कीम अकाउंट स्कीम लॉन्च करण्यात आली आहे. महिलाना सशक्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. याशिवाय बँक महिलांना टू व्हिलरसाठी 0.25 टक्के व्याजदराने व्याज देते. याशिवाय ऑटो लोन आणि मॉर्टगेज लोनवर लागणाऱ्या प्रोसेसिंग फीजवर 25 टक्के सूट देण्यात येत आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाचा महिलांसाठी बिझनेस आणि मॅनेजमेंट कोर्स

राष्ट्रिय महिला आयोगाची देखील महिलांसाठी ही दुसरी मोहिम आहे. महिला आयोगाने नुकतंच बिझनेस आणि मॅनेजमेंट कोर्स सुरु केला होता. हा कोर्स 5 हजार महिला उद्येजिकांसाठी सुरु करण्यात आला होता. वी थिंक डिजीटल या मोहिमेअंतर्गत हा कोर्स लॉन्च करण्यात आला होता (National commission for women organizes training course for women).

हेही वाचा : प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या; आता रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग विसरा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.