Mukesh Ambani : याला म्हणत्यात सिक्सर! या कर्मचाऱ्याला मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक पगार, मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्यापेक्षा या कर्मचाऱ्याला पगार जास्त मिळतो. या कर्मचाऱ्याकडे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

Mukesh Ambani : याला म्हणत्यात सिक्सर! या कर्मचाऱ्याला मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक पगार, मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 7:11 PM

नवी मुंबई : तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण रिलायन्स समूहात (Reliance Group) एक कर्मचारी असा पण आहे, ज्याचे वेतन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यापेक्षा अधिक आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाचा पसारा खूप मोठा आहे. आयपीएलपासून तर रिलायन्स मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. तर मुंबई इंडियन्सशी संबंधित सर्व व्यवस्थापन निखिल मेसवानी (Nikhil Meswani) हे पाहतात. ते या आयपीएल क्रिकेट फ्रेंचाईजचे रोजचे काम बघतात. मेसवानी यांचा पगार मुकेश अंबानी यांच्यापेक्षा पण अधिक आहे. पण त्यांचे काम केवळ आयपीएल आणि मुंबई इंडियन्सपुरते सीमित नाही.

इतका जास्त आहे पगार मुकेश अंबानी यांचा पगार जास्त आहे. पण त्यांच्यापेक्षा पम निखील मेसवानी यांचे वेतन अधिक आहे. अंबानी यांच्यापेक्षा ते वार्षिक 9 कोटी रुपये अधिक कमवितात. ही गोष्ट अनेकाना पटत नाही. पण हे सत्य आहे. अंबानी समूहात अनेक दिग्गजांना गलेलठ्ठ पगार आहे. त्यात मेसवानी यांची कमाई अधिक आहे. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत.

मोठे भाऊ पण रिलायन्समध्येच मेसवानी बंधू हे रिलायन्ससाठी खास आहे. त्यांनी हा समूह मोठा करण्यात योगदान दिले आहे. निखील मेसवानी यांचे मोठे बंधू हितल मेसवानी हे पण रिलायन्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. निखिल मेसवानी यांचे वडील रसिकलाल मेसवानी, धीरुभाई अंबानी यांचे चुलत भाऊ असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संस्थापकांपैकी एक संचालक आहेत. मेसवानी कुटुंबिय रिलायन्स उभं करण्यात अग्रेसर राहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

24 कोटींचे वार्षिक पॅकेज मेसवानी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. मेसवानी हे मुकेश अंबानी यांचे चूलत भाऊ आहेत. ते 1986 पासून या कंपनीशी जोडल्या गेले आहेत. त्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 24 कोटी रुपये कमावले. ही रक्कम मुकेश अंबानी यांच्या पगारापेक्षा अधिक आहे. अंबानी यांनी त्यांचा पगार गेल्या 10 वर्षांपासून 15 कोटींवरच थांबविला आहे. कोरोना काळात तर त्यांनी त्यांचा पगार कोविड-19 महामारीत मदतीसाठी दिला.

अनेक प्रकल्पात ठसा मेसवानी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. रिलायन्सच्या यशात या दोन्ही भावांचा मोठा रोल, भूमिका आहे. अनेक प्रकल्पात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून रिलायन्समध्ये सुरुवात केली. नंतर मोठ्या हुद्दापर्यंत ते पोहचले. जामनगर येथील रिलायन्सची रिफायनरीसहीत इतर अनेक महत्वाच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग राहिला. टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरमध्ये पण त्यांचा मोठा हात आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.