घर बसल्या लागेल लॉटरी! हे 3 वर्क फ्रॉम होम जॉब करतील मालामाल
Work From Home | या ऑनलाईन जगात तुम्हाला घरबसल्या पण कमाई करता येते. तुमच्याकडे केवळ ही कौशल्य तेवढी हवी. तुमची स्वप्न कंपनीत जाऊनच नाही तर घरबसल्या पण साकार करता येऊ शकतात. हे तीन जॉब खास तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकता. तुमच्या गुणवत्तेच्या दमावर तुम्ही एकाच आठवड्यात एका महिन्याचा पगार कमावू शकतात.
नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : कोविड-19 महामारीनंतर अनेक कंपन्यांनी कार्यशैलीत बदल केला. त्यांनी वर्क कल्चर बदलवले. कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची परवानगी दिली. अर्थात सर्वच क्षेत्रात असं करणे शक्य नव्हतं. पण या सोयीमुळे वर्क फ्रॉम होमचे परदेशातील मॉडेल भारतातही रुजू झाले. आयटीसह अनेक कंपन्यांनी त्याचा लागलीच स्वीकार केला. कोरोनाची धास्ती कमी झाल्यावर अनेक कंपन्यांनी हायब्रिड मॉडेल निवडले आहे. त्यानुसार, आठवड्यातील दोन दिवस कार्यालयात तर उर्वरीत तीन दिवस घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली. तुम्हाला पण घरबसल्या कमाई करायची असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. हे तीन वर्क फ्रॉम होम जॉब तुम्हाला घरबसल्या कमाईची संधी देतील.
फ्रीलान्स रायटिंगमध्ये करिअर
जर तुमच्याकडे चांगले लिखाणाचे कौशल्य असेल तर घरातूनच तुम्ही फ्रीलान्स रायटिंगच्या माध्यमातून काम सुरु करु शकता. त्यासाठी अनेक मीडिया हाऊस, इतर कंपन्या संधी देतात. यासंबंधीचे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. अपवर्क, फिवरर याठिकाणी तुमचे खाते उघडता येते. भारतासह परदेशातील लिखाणाचे काम तुम्हाला मिळू शकते. परदेशातील काम मिळाले तर तुम्हाला PayPal खाते उघडावे लागेल. या खात्यात तुम्हाला परदेशातून कामाचे दाम मागता येतील. या कामातून महिन्याला 40-50 हजार रुपये कमाई करता येते.
डाटा एनालिसीसमधून तगडी कमाई
सध्याच्या घडीला डाटा एनालिसीसची मोठी मागणी आहे. जर हे काम येत असेल या कंपनीत तुम्ही जॉबसाठी अर्ज करु शकता. इतकेच नाही तर इतर पण अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले होतील. डाटा एनालिसीससाठी ऑनलाईन कोर्स पण उपलब्ध आहे. काही कंपन्या कोर्स पूर्ण झाल्यावर ऑनलाईन काम पण उपलब्ध करुन देतात. तुम्हाला प्रमाणपत्रासोबतच जॉब पण ऑफर होतात. अर्थात सुरुवातीला इनटर्नशीप अथवा ट्रेनी म्हणून काम केल्यास अनुभवानंतर पॅकेज वाढते. हे काम करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन, एक लॅपटॉप, संगणकाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात वर्क फ्रॉम होमचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 200 रुपये ते 1,500 रुपये प्रति तास असे दाम मिळतात.
अनुवादकाचे काम
जर तुम्हाला एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान असेल तर तुम्ही अनुवादक, ट्रान्सलेटरचे काम मिळू शकते. हे काम पण घरबसल्या करता येते. इंग्रजीवर चांगली पकड असेल. हिंदी पण चांगली असेल तर तुम्हाला घरबसल्या कमाई करता येते. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक प्लॅटफॉर्म योग्य उमेदवाराला प्रतिशब्द 1 ते 2 रुपये ते त्यापेक्षा अधिकचा मेहनताना देतात. त्यामुळे महिन्याला सहज 30 हजार रुपयांची कमाई होते.