नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 व डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. गेल्याच आठवड्यात केजरीवाल सरकारने व्हॅट कपातीचा निर्णय घेतल्याने दिल्लीमध्ये इंधनाच्या किमती काहीप्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 104.67 आणि डिझेल 89.79 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91. 43 रुपये इतके आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
‘एससीएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?
‘या’ तीन बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतोय चांगला परतावा; पहा किती आहे व्याजदर
क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण