New gas connection : गॅस कनेक्शनच्या दरात मोठी वाढ; आता मोजावे लागणार 4400 रुपये, नवे दर उद्यापासून लागू

पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस कनेक्शन घेण्यासाठी ठेवाव्या लागणाऱ्या सिक्युरीटी डिपॉझिटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आता तुम्हाला एक कनेक्शन घेण्यासाठी 750 रुपये, तर दोन कनेक्शन घेण्यासाठी दीड हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

New gas connection : गॅस कनेक्शनच्या दरात मोठी वाढ; आता मोजावे लागणार 4400 रुपये, नवे दर उद्यापासून लागू
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 1:11 PM

नवी दिल्ली : महागाई (Inflation) वाढतच आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून सीएनजी, पीएनजीच्या दरापर्यंत सर्वच गोष्टींच्या भावात मोठी वाढ झाली आहे. महागाई गगनाला भिडली असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. तुम्ही जर नवे एलपीजी गॅसचे कनेक्शन (gas connection) घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता गॅस कनेक्शन घेण्यासाठी देखील तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून (Petroleum Company) आता गॅस कनेक्शनसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सिंगल एलपीजी गॅसचे कनेक्शन घ्यायचे झाल्यास 14.2 किलोच्या गॅससाठी 1450 रुपये शुल्क भरावे लागायचे. मात्र आता त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली असून, आता सिंगल एलपीजी गॅसच्या कनेक्शनसाठी तुम्हाला 2200 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच पेट्रोलियम कपंन्यांकडून गॅसच्या कनेक्शनमध्ये 750 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नवे दर 16 जूनपासून लागू

एलपीजी गॅसचे नवे कनेक्शन घेणे आता महाग झाले आहे. एका घरगुती 14.2 किलोच्या गॅसचे कनेक्शन घ्यायचे असे तर तुम्हाला आता अतिरिक्त सातशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत. तर तुम्ही जर दोन एलपीजी गॅसचे कनेक्शन घेतले तर तुम्हाल दीड हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. पूर्वी दोन एलपीजी गॅसच्या कनेक्शनसाठी 2900 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता त्यामध्ये दीड हजार रुपयांची भर पडली असून, तुम्हाला आता दोन गॅसच्या कनेक्शसाठी 4400 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागणार आहे. नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत. यामुळे गॅसचे नवे कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्रहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांना दुहेरी फटका

एकीकडे घरगुती आणि व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच आहे. घरगुती गॅस सिलिंडरने देखील हजाराचा टप्पा ओलांडला आहे. असे असताना आता पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस कनेक्शसाठी भराव्या लागणाऱ्या सिक्युरीटी डिपॉडिटमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. एका गॅसचे कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला सातशे पन्नास रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. सोबतच रेग्युरेटरचा चार्ज देखील वाढवण्यात आला आहे. रेग्युरेटरच्या चार्चमध्ये शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजी, पीएनजीचे दर देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.