New Generation : कॉर्पोरेट घराण्यांमध्ये नवीन पिढीचा उदय! नवीन मालक घेणार जबाबदारी

New Generation : भारतीय बिझनेस टायकूनची पुढची पिढी आता व्यवसायात उतरली आहे. कोर्पोरेट जगतात पण खांदेपालट सुरु आहे. आता अनेक उद्योगांचे प्रमुख निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्याठिकाणी नवीन मालकांची वर्णी लागत आहे.

New Generation : कॉर्पोरेट घराण्यांमध्ये नवीन पिढीचा उदय! नवीन मालक घेणार जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 6:38 PM

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : ‘आता आम्ही आरामाने बसून नवीन पिढी आमच्यापेक्षा कशी जोरदार कामगिरी करते हे पाहत त्यांचे कौतूक केले पाहिजे’, असे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी म्हटले होते. नवीन पिढीकडे धुरा सोपविण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी 2021 सालीच संकेत दिले होते. तेव्हापासूनच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जबाबदारी नवीन पिढीवर टाकण्यात येईल हे स्पष्ट झाले होते. या वक्तव्यानंतर अडीच वर्षांनी रिलायन्समध्ये (Reliance Industry) खांदेपालट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांच्या नवीन पिढीला संधी देण्यात आली. देशभरातील अनेक उद्योग घराण्यात हाच ट्रेंड सुरु आहे. आता नवीन पिढीने सूत्र हाती घ्यावी यासाठी नियोजन सुरु करण्यात आले आहे. भाकरी फिरवण्याचे संकेत अनेक उद्योजकांनी काही वर्षांपासूनच दिले आहे. त्यानुसार, नवीन पिढी (New Generation) घडविण्याचे काम सुरु होते. आता या नव्या पिढीवर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव्या पिढीवर भार

मुकेश अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशा, मुलगा आकाश आणि अनंत यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात सहभागी करुन घेतले. देशातील वेगवेगळ्या कॉर्पोरेट घरण्यातील पॅटर्न पाहाता अनेक उद्योगात नवीन पिढीच्या हातीच कारभाराची सूत्र असल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

हे मालक झाले निवृत्त

अनेक कॉर्पोरेट घराणे, मोठ्या कंपन्यांचे प्रमुख अगोदरच निवृत्त झाले आहे. यामध्ये एल अँड टीचे ए. एम. नाईक, एचडीएफसीचे दीपक पारेख, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांचा समावेश आहे. यामध्ये रतन टाटा, आदि गोदरेज, अजिम प्रेमजी, शिव नादर यांनी तर कधीचीच निवृत्ती स्वीकारली. त्यांना निवृत्त होऊन 10 वर्षांचा कालावधी लोटला.

हे पण घेणार निर्णय

या यादीत डॉ. प्रताप रेड्डी, आरसी भार्गव, नुस्ली वाडिया, बाबा कल्याणी, हर्ष मारीवाला, वेणू श्रीनिवासन, किरण मजूमदार-शॉ, पवन मुंजाल, अनिल अग्रवाल, आनंद महिंद्रा, नंदन नीलेकणि, अजय पीरामल, दिलीप सांघवी आणि सुनील मित्तल हे पण काही दिवसांत पूर्णपणे निवृत्त होतील अशी शक्यता आहे. अथवा हे दिग्गज त्यांच्या कामाचा भार हलका करतील.

नव्या पिढीला संधी

बजाज, अपोलो, भारत फोर्ज कंपन्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या सदस्यांनी कामास सुरुवात केली आहे. सिप्ला सारख्या कंपन्यांमध्ये पण उत्तराधिकारी समोर येत आहेत. महिंद्रा समूह, एशियन पेंट्स, मॅरिको आणि गोदरेज कुटुबांना यापूर्वीच कंपनी व्यवस्थापनात जागा देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.