IT पोर्टलमधील घोळ संपेनात, निर्मला सीतारामन यांच्या हस्तक्षेपानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

Income Tax Portal | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीला झापलेही होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, या सगळ्यानंतरही IT पोर्टलमध्ये विशेष फरक पडलेला नाही.

IT पोर्टलमधील घोळ संपेनात, निर्मला सीतारामन यांच्या हस्तक्षेपानंतरही परिस्थिती 'जैसे थे'
आयकर पोर्टल
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:32 AM

नवी दिल्ली: करदात्यांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या IT पोर्टलमधील घोळ अजूनही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. अगदी पहिल्या दिवसापासून या पोर्टलचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीला झापलेही होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, या सगळ्यानंतरही IT पोर्टलमध्ये विशेष फरक पडलेला नाही. त्यामुळे सामान्य करदात्यांना अजूनही मनस्ताप सहन करावा लागत आहे. (New Income Tax Portal technical glitches continue after one month of launch people facing trouble)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत नव्या Income Tax E-Filing पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यास सांगितले होते. त्यावर इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांनी ITR बघणे, इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासह पाच तांत्रिक गोष्टी आठवडाभरात निकालात काढण्याचे आश्वासन दिले. निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. आयकर पोर्टल हे वापरण्याजोगे आणि सुलभ करावे. करदात्यांना हे पोर्टल वापरताना चांगला अनुभव मिळाला पाहिजे. तसेच करदात्यांना येणाऱ्या अडचणींविषयी निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख आणि इतर अधिकाऱ्यांनी हे आक्षेप नोंदवून घेतले. नव्या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच इन्फोसिसकडून काम सुरु असणाऱ्या गोष्टींविषयी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माहितीही दिली. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI चे पदाधिकारी, ऑडिटर्स आणि काही सल्लागारही उपस्थित होते.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल, करदात्यांसाठी कोणती सुविधा?

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

(New Income Tax Portal technical glitches continue after one month of launch people facing trouble)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.