New Year ला आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, 1 जानेवारीपासून होणार पगार वाढ

विप्रोने 1 जानेवारी 2021 पासून आपल्या जुनिअर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

New Year ला आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, 1 जानेवारीपासून होणार पगार वाढ
4 लाख कव्हरेज देखील उपलब्ध - आता एकूण जमा रक्कमेबद्दल बोलायचं झालं तर 20 वर्षांत तुम्ही 143778 रुपये जमा कराल आणि तुम्हाला 265000 रुपये मिळतील. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये तुम्ही 30 टक्क्यांपर्यंतचा करसुद्धा वाचवू शकाल म्हणजेच तुमचे 44660 रुपये वाचतील.
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 7:35 AM

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रामध्ये जास्त पगारासाठी कर्मचारी वारंवार नोकऱ्या बदलताना दिसतात. अशात आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत थांबवून घेण्यासाठी आयटी कंपनी विप्रोने (Wipro) मोठं गिफ्ट दिलं आहे. विप्रोने 1 जानेवारी 2021 पासून आपल्या जुनिअर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (new year gift wipro to roll out salary hikes for junior staff)

बंगळुरूच्या या कंपनीने 1 डिसेंबर 2020 पर्यंत उत्तम काम करणाऱ्या B3 बँडच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विप्रोने कर्मचाऱ्यांना कामाच्या अनुभवावर आधारित प्रत्येक बँडमध्ये सब-रँकिंगसोबत पाच बँडमध्ये (A ते E) कॅटेगराईज केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विप्रोचे 1.85 लाख कर्मचारी हे बी 3 बँडमध्ये मोडतात.

विप्रोने ई-मेलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या या जीवघेण्या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांनी या कठीण काळातही खूप मेहनत केली. त्यामुळे बँड बी 3 मध्ये मोडणाऱ्या आणि त्यापेक्षा कमी बँडमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2021पासून वेतन वृद्धि (MSI) सुविधादेखील सुरू करण्यात येणार आहे.

7,000 कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन

विप्रोच्या ई-मेल स्टेटमेंटनुसार, बँड C1 आणि त्यावरील बँडमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 जून 2021 पासून MSI मिळेल. तर विप्रो त्यांच्या तब्बल 7,000 कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार असून त्यांचं प्रमोशन करण्यात येणार आहे. यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असणार आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींची पगार कपात करण्यात आली. पण अशात आता सगळं सुरळित होत असताना कर्मचाऱ्यांसाठीही चांगल्या संधी समोर येत आहेत. (new year gift wipro to roll out salary hikes for junior staff)

इतर बातम्या – 

खबरदार! विनापरवानगी LIC चा लोगो वापराल, तर कठोर शिक्षेस तयार राहा

…तर बँक खाते रिकामं झालेच म्हणून समजा; SBI चा पुन्हा एकदा ग्राहकांना अलर्ट

(new year gift wipro to roll out salary hikes for junior staff)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.