Fake Currency Notes : 500 रुपयांची नकली नोट व्हायरल, तुमच्या खिशात तर नाही ना ही फेक नोट?
Fake Currency Notes : 500 रुपयांची नकली नोट व्हायरल झाली आहे..
नवी दिल्ली : जर तुमच्याकडे 500 रुपयांची नोट असेल तर ती चांगल्या प्रकारे तपासा. कारण आता नकली नोटेचे (Fake Currency Notes) पेव फुटले आहे. बाजारात 500 रुपयांच्या नोटेसंबंधीचा एका मॅसेज प्रचंड व्हायरल होत आहे. 500 रुपयांची ही नोट बोगस (Bogus) असल्याचा मॅसेज सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे पत्रसूचना कार्यालयाने याविषयीच्या संदेशाचा पडताळा (PIB Fact Check) घेतला आहे.
या मॅसेजनुसार ज्या 500 रुपयांच्या नोटेवर हिरवी पट्टी RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या छायाचित्राजवळ आहे. त्यामुळे ही नोट नकली आहे. व्हायरल मॅसेजमध्ये ज्या नोटेवर हिरवी पट्टी RBI गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या छायाचित्राजवळ आहे, अशी 500 रुपयांची नोटी न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
PIB Fact Check ने याविषयीच्या मॅसेजविषयी ट्विट केले आहे. पीआयबीच्या दाव्यानुसार, हा संदेश चुकीचा आहे. जनतेने या भूलथापांना बळी पडू नये. आरबीआयच्या नियमानुसार या दोन्ही नोट वैध आहेत. हिरव्या पट्टीने त्यावर काहीच फरक पडत नाही.
एक मैसेज में यह दावा किया जा रहा है कि ₹500 का वह नोट नकली है जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास ना होकर गांधीजी की तस्वीर के पास होती है।#PIBFactCheck
➡️यह दावा फ़र्ज़ी है।
➡️@RBI के अनुसार दोनों ही तरह के नोट मान्य होते हैं।
?https://t.co/DuRgmRJxiN pic.twitter.com/IEElFpaXf1
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 9, 2022
RBI ने कोणतीही नोट ओळखण्यासाठी एकूण 17 ओळख पटविणारी चिन्हे सांगितली आहेत. त्यानुसार, या चिन्हांमुळे खऱ्या आणि खोट्या नोटेत फरक ओळखता येतो. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटेसंबंधी कोणती चिन्ह महत्वाची आहेत ते लक्षात घेऊयात.
दिव्यासमोर नोट धरल्यास त्यावर 500 लिहिलेले आढळेल. महात्मा गांधीचे छायाचित्र मध्यवर्ती असते. भारत आणि इंडिया अशी नावे कोरलेली असतात. नोट मोडल्यावर त्यावर सुरक्षेचा थ्रेड रंगात दिसून येतो. हिरव्या रंगातून निळ्या रंगात बदलविता येतो.
गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी क्लॉज, प्रोमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो नोटेच्या दोन्ही बाजूने चिन्हाकिंत असतो. महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क दिसून येतो. डाव्या बाजूचे आणि खाली उजव्या बाजूचे क्रमांक डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.