NHPC Recruitment 2021: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती, त्वरित अर्ज करा
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) ने जारी केलेल्या या रिक्त जागेत (NHPC Recruitment 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलीय. NHPC ही सार्वजनिक क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी आहे.
नवी दिल्लीः NHPC Recruitment 2021: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक राजभाषा अधिकारी यांच्यासह अनेक पदांवर भरतीसाठी राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाने अधिसूचना जारी केलीय. या अधिसूचनेद्वारे एकूण 173 पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट- nhpcindia.com ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) ने जारी केलेल्या या रिक्त जागेत (NHPC Recruitment 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलीय. NHPC ही सार्वजनिक क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी आहे. भारत सरकारचा त्यात 70.95% हिस्सा आहे. यामध्ये (NHPC भरती 2021) नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी समोर आलीय. देशातील सर्वात मोठी जलविद्युत कंपनी आहे, जी ऊर्जा प्रकल्पांची रचना आणि संचालन करते.
रिक्त पदाचा तपशील जाणून घ्या
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 13 पदे सहाय्यक राजभाषा – 07 पदे कनिष्ठ अभियंता सिव्हिल – 68 पदे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल- 34 पदे कनिष्ठ अभियंता यांत्रिक- 31 पदे वरिष्ठ लेखापाल – 20 पदे
पदांनुसार शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी- यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांच्या अनुभवासह एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. सहाय्यक राजभाषा अधिकारी- यासाठी हिंदी/इंग्रजी भाषेत पदव्युत्तर पदवी, तीन वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. कनिष्ठ अभियंता- या पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका असावी. वरिष्ठ लेखापाल- सीए किंवा सीएमए पास उमेदवार यामध्ये अर्ज करण्यास पात्र असतील.
कमाल वयोमर्यादा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी- 33 वर्षे सहाय्यक राजभाषा अधिकारी- 35 वर्षे कनिष्ठ अभियंता – 30 वर्षे वरिष्ठ लेखापाल- 33 वर्षे
निवड प्रक्रिया
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) द्वारे जारी करण्यात आलेल्या या रिक्त जागेत संगणक आधारित ऑनलाईन चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ही परीक्षा 200 गुणांची असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. इच्छुक उमेदवार एनएचपीसी लिमिटेड, nhpcindia.com च्या अधिकृत वेबसाइटवर करिअर विभागात दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.
परीक्षा केंद्र
ही परीक्षा अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर, जयपूर, जम्मू, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पणजी, रांची, रायपूर आणि 22 शहरांमध्ये होणार आहे.
संबंधित बातम्या
Bank Jobs 2021: साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
NHPC Recruitment 2021: Recruitment for Senior Medical Officer and Junior Engineer, Apply Now