Nifty 50 : निफ्टी 50 नाही Nifty 51, निर्देशांकात बदल, या नवीन भिडूची एंट्री

Nifty 50 : राष्ट्रीय निर्देशांकात आता बदलाचे वारे वाहत आहे. सर्वांचा लाडका असलेल्या निफ्टी 50 मध्ये नवीन भिडू दाखल होत आहे. कोणता आहे हा नवीन शेअर, का होत आहे हा बदल..

Nifty 50 : निफ्टी 50 नाही Nifty 51, निर्देशांकात बदल, या नवीन भिडूची एंट्री
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 4:30 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : गुंतवणूकदारांना शेअर बाजारात काही बदल पाहायला मिळू शकतात. राष्ट्रीय निर्देशांकात हा बदल होईल. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) याविषयीची माहिती दिली. त्यानुसार सर्वांचा लाडका असलेल्या निफ्टी 50 मध्ये नवीन शेअर दाखल होत आहे. त्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. या बदलानंतर निफ्टी 50 न राहता निफ्टी 51 होईल (Nifty51). आता हा नवीन शेअर कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या शेअरसाठी थेट निर्देशांकात का बदल करण्यात येत आहे, असे ही अनेक गुंतवणूकदारांना वाटत असेल, त्याचा काय परिणाम होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एनएसईने दिली आहेत.

का करण्यात येत आहे बदल

हा बदल रिलायन्स समूहासाठी करण्यात येत आहे. 20 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरसाठी विशेष प्री-ओपन सेशन आयोजीत करण्यात आले आहे. या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज फायनेन्शिअल सर्व्हिसेजचे डिमर्जर करण्यात येणार आहे. म्हणजे 20 जुलै हा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांसाठी मोठा दिवस आहे.

हे सुद्धा वाचा

रिलायन्समध्ये मोठी अपडेट

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिमर्जचे काम सुरु आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड (Jio Financial Services) हा शेअर निफ्टी, सेन्सेक्समध्ये काही दिवसांसाठी सहभागी होईल.

20 जुलै रोजी बदल

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंटच्या डिमर्जरची रेकॉर्ड डेट 20 जुलै आहे. जिओ फिनचा शेअर मिळावा यासाठी 19 जुलैपर्यंत RIL खरेदी करणे आवश्यक आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटचे नाव बदलून आता जिओ फायनेन्शिअल असे होईल. या विलिनीकरणानंतर RIL च्या शेअरधारकाला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 1 शेअरच्या बदल्यात रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंटचा एक शेअर देण्यात येणार आहे. जिओ फिन शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. याविषयीची तारीख अजून निश्चित नाही.

20 जुलै रोजी प्री-ओपनिंग सेशन

20 रोजी 9 ते 10 वाजण्याचा दरम्यान विशेष प्री ओपन सेशनचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी RIL चा बंद भाव आधार मानून ट्रेडिंग होईल. सूचीबद्ध होईपर्यंत जिओ फिन निफ्टीचा 51 वा शेअर असेल. हा शेअर सूचीत सहभागी झाल्यानंतर तो बाहेर पडेल.

इतके आहे मूल्य

ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या अहवालानुसार, जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजचे मूल्य 1.52 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. विलिनीकरण होताच भारताची जिओ फायनेन्शिअल पाचवी सर्वात मोठी आर्थिक सेवा पुरवठादार कंपनी होईल.

NCLT दिली मंजूरी

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडच्या विलिनीकरणाला एनसीएलटीने 7 जुलै रोजी मंजूरी दिली होती. ही कंपनी आता डिजिटल पद्धतीने सर्व सेवा ऑनलाईन देईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.