नीरव मोदीच्या बहिणीने लंडनमधील बँकेतून भारत सरकारच्या खात्यावर 17 कोटी जमा केले, कारण काय?

| Updated on: Jul 02, 2021 | 5:43 AM

सक्तवसुली संचनालयाने (एनफोर्समेंट डायरेक्टोरेट) दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (1 जुलै) फरार व्यापारी कारोबारी नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदीने युके बँक खात्यातून 17 कोटी रुपये भारत सरकारला पाठवले आहेत.

नीरव मोदीच्या बहिणीने लंडनमधील बँकेतून भारत सरकारच्या खात्यावर 17 कोटी जमा केले, कारण काय?
Follow us on

नवी दिल्ली : सक्तवसुली संचनालयाने (एनफोर्समेंट डायरेक्टोरेट) दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (1 जुलै) फरार व्यापारी कारोबारी नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदीने युके बँक खात्यातून 17 कोटी रुपये भारत सरकारला पाठवले आहेत. भारत सरकारने पूर्वी मोदीला पीएनबी घोटाळ्या (PNB Sacm) सहकार्य केल्यास तिच्यावर कारवाई करणार नाही, असं आश्वासन दिलं होतं (Nirav Modi sister Purvi Modi pay 17 crore to Indian government in PNB fraud case).

24 जुनला पूर्वी मोदीने ईडीला सांगितलं, “माझ्या नावावर लंडनमध्ये एक बँक खातं आहे. ते माझा भाऊ नीरव मोदीने माझ्या नावावर उघडलं होतं. त्या खात्यावरील पैसे माझे नाही.” दरम्यान पूर्वीने भारताला दिलेल्या आश्वासनानुसार या बँक खात्यातील 23 लाख 16 हजार 889 डॉलर भारत सरकारच्या खात्यावर पाठवले.

उच्च न्यायालयाकडून दणका

नीरव मोदी सध्या इंग्लंडमधील तुरुंगाची हवा खात आहे. त्याच्याविरोधात 2 बिलियन डॉलरच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणी खटला सुरू आहे. मागील आठवड्यातत यूके हाईकोर्टाने त्याला मोठा झटका दिलाय. न्यायालयाने त्याची याचिका फेटाळलीय. या याचिकेत त्याने स्वतःकडे भारताला प्रत्यार्पित करण्याला आव्हान दिलं होतं. एप्रिलमध्ये यूके होम सेक्रेटरीने प्रीति पटेल मोदीच्या भारत प्रत्यर्पणाचे आदेश दिले होते.

मार्च 2019 मध्ये नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधींचा घोटाळा करुन नीरव मोदी जानेवारी 2018 मध्ये लंडनमध्ये पळाला. त्याच्यावर लेटर ऑफ अंडरटेकिंग्ससाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. लंडनमध्ये 19 मार्च 2019 रोजी त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगाची हवा खातोय. सध्या तो साऊथ-वेस्ट लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात आहे.

Nirav Modi sister Purvi Modi pay 17 crore to Indian government in PNB fraud case