निर्मला सितारमण साधणार बँकांच्या प्रमुखांशी संवाद; ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  या बँक आणि प्रमुख वित्तीय संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

निर्मला सितारमण साधणार बँकांच्या प्रमुखांशी संवाद; 'या' प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 10:40 AM

नवी दिल्ली – आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  या बँक आणि प्रमुख वित्तीय संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. अर्थव्यवस्थेवर असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे झालेली हानी, तसेच त्यातून सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय चर्चेमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआसी बँक, कोटक महिंद्रा बँक, चोलामंडल इन्वेस्टमेंट, श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस आणि टाटा कॅपिटल यांचे सीईओ सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कर्ज वितरणावर होणार चर्चा 

या बैठकीमध्ये विविध उद्योगांना करण्यात येणाऱ्या अर्थपुरवठ्यावर देखील चर्चा होणार आहे. स्टार्टअपला कशापद्धतीने जास्तीत जास्त कर्ज देण्यात येऊ शकते, तसेच कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांची भूमिका काय हवी यावर  देखील चर्चा होणार आहे. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

15 दिवसांमध्ये 63,574 कोटींच्या कर्जाचे वाटप 

दरम्यान कोरोनाच्या सावटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या उद्योजकांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख बँकांकडून कर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून 31 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 63,574 कोटी रुपयांचे लोन वाटप करण्यात आल्याची माहिती बँकांच्या वतीने देण्यात आली. देशातील 3.2 लाख  लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

Sponsored: आदित्य बिर्ला सन लाइफ (ABSL) म्युच्युअल फंडाचे सीआयओ महेश पाटील म्हणतात, बिझनेस सायकल NFO हा एक प्रकारचा ऑल-वेदर फंड आहे, जो सेक्टोरल किंवा थीमॅटिक कल्पनांपेक्षा वेगळा

भारत येत्या मार्चअखेर 400 अब्ज डॉलरची निर्यात करेल; पियुष गोयल यांचा विश्वास

काय आहे राष्ट्रीय पेन्शन योजना? जाणून घ्या कसा मिळतो लाभ

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.