गायीच्या शेणापासून रंग तयार करणार, नितीन गडकरी ब्रँड अ‍ॅम्बेसडर

Vedic Paint | शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी एक प्लांट उभारण्यासाठी 15 लाखांचा खर्च येतो. या माध्यमातून रोजगारनिर्मिती झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्याप्रमाणावर चालना मिळू शकते.

गायीच्या शेणापासून रंग तयार करणार, नितीन गडकरी ब्रँड अ‍ॅम्बेसडर
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 7:19 AM

नवी दिल्ली: सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी खादी प्राकृतिक पेंटच्या (Khadi Prakritik Paint) प्रसारासाठी आपण सदिच्छादूत (Brand Ambassador) काम करणार असल्याचे जाहीर केले. देशभरात या वेदिक पेंटच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवा उद्योजकांना या व्यवसायात आणण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. जयपूरमध्ये शेणापासून रंग तयार करण्याच्या स्वयंचलित यंत्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी एक प्लांट उभारण्यासाठी 15 लाखांचा खर्च येतो. या माध्यमातून रोजगारनिर्मिती झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्याप्रमाणावर चालना मिळू शकते. (Nitin Gadkari appointed as brand ambassador of khadi prakrtik paint)

शेणापासून बनवलेला रंग लाँच

नितीन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021ला खादी ग्रामोद्योग आयोगानं शेणापासून बनवलेल्या पेंटचे लाँचिंग केलं होतं. त्यावेळी गडकरी यांनी हा रंग इकोफ्रेंडली, विष रहित असल्याचं म्हटलं होते. भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून शेणापासून बनवलेल्या रंगाला प्रमाणित करण्यात आलं आहे. मध्यम आणि लघू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या माहितीनुसार नितीन गडकरींनी शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रेरणा दिली होती. जयपूर येथील कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने यातील पेटंट मिळवलं आहे. शेणामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम याचा वापर केला आहे.

जयपूरमध्ये प्रशिक्षण

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणस्नेही रंगांची बाजारात मागणी वाढली आहे.सध्या जयपूरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहेत. 350 जण प्रतीक्षा यादीत असल्याची देखील माहिती आहे. हे प्रशिक्षण 7 दिवसांचे असते. आगामी काळात ट्रेनिंगमधील सुविधा वाढवण्याचा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. यामुळे गावागावातील लोक शेणापासून रंग बनवण्याची कंपनी स्थापन करु शकतात.

शेतकऱ्यांची कमाई वाढणार

शेणापासून बनवलेल्या पेंटची विक्री वाढल्यानंतर गावामध्ये शेणाची खरेदी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 30 हजार रुपये शेणाच्या विक्रीतून मिळू शकतात. सध्या शेतकरी शेणाचा खत म्हणून वापर करतात. मात्र, रंगाच्या कंपन्या निर्माण झाल्यानंतर हे चित्र बदलणार आहे.

संबंधित बातम्या:

सरकार शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार, गावात कंपनी सुरु करुन मोठी कमाई करा, वाचा सविस्तर

Nitin Gadkari | शेणापासून रंग बनवण्याच्या उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी : नितीन गडकरी

Vedic Paint | गायीच्या शेणापासून वैदिक रंगाची निर्मिती, वैशिष्ट्यं काय?

(Nitin Gadkari appointed as brand ambassador of khadi prakrtik paint)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.