मोदी सरकारची मोठी घोषणा, शेणापासून तयार होणाऱ्या रंगामुळे शेतकऱ्यांना मिळणार फायदा

Vedic Paint | शेणापासून रंग तयार करणारे स्वयंचलित यंत्र लावण्यात आले आहे. त्यामुळे रंगनिर्मितीची क्षमता दुप्पट झाली आहे. आता या कारखान्यात दिवसाला 1000 लीटर रंगाची निर्मिती होऊ शकेल. त्यामुळे गाईच्या शेणाची किंमत वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल.

मोदी सरकारची मोठी घोषणा, शेणापासून तयार होणाऱ्या रंगामुळे शेतकऱ्यांना मिळणार फायदा
वेदिक पेंट
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 9:46 AM

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खादी पेंटच्या प्रसारासाठी सदिच्छादूत पद (Brand Ambassador) स्वीकारल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या घरामध्ये हा रंग द्यायचे ठरवले आहे. त्यासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जयपूरच्या कारखान्याला 1000 लीटर रंगाची (500 लीटर डिस्टम्बर आणि 500 लीटर इमल्शन) ऑर्डर दिली. (Nitin Gadkari will use Khadi or Vedic paint made by cow dung in his house)

जयपूरच्या कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थानात (KNHPI) हा कारखाना उघडण्यात आला आहे. याठिकाणी शेणापासून रंग तयार करणारे स्वयंचलित यंत्र लावण्यात आले आहे. त्यामुळे रंगनिर्मितीची क्षमता दुप्पट झाली आहे. आता या कारखान्यात दिवसाला 1000 लीटर रंगाची निर्मिती होऊ शकेल. त्यामुळे गाईच्या शेणाची किंमत वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल.

खादी प्राकृतिक पेंटचा शेतकऱ्यांना काय फायदा?

हा रंग प्राकृतिक पेंट आणि डिस्टम्बर किंवा इमल्शन पेंट अशा दोन स्वरुपात उपलब्ध आहे. या रंगात शिसे, क्रोमिअम, कॅडमियमचा वापर करण्यात आलेला नाही. 2 लीटर ते 30 लीटरच्या पॅकिंगमध्ये या रंगाची विक्री केली जाते. त्यामुळे आता स्थानिक शेतकऱ्यांना शेणाची विक्री करून उत्पन्न मिळवता येईल. एका गाईपाठी शेतकऱ्याला 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा सरकारचा दावा आहे.

जयपूरमध्ये प्रशिक्षण

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणस्नेही रंगांची बाजारात मागणी वाढली आहे.सध्या जयपूरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहेत. 350 जण प्रतीक्षा यादीत असल्याची देखील माहिती आहे. हे प्रशिक्षण 7 दिवसांचे असते. आगामी काळात ट्रेनिंगमधील सुविधा वाढवण्याचा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. यामुळे गावागावातील लोक शेणापासून रंग बनवण्याची कंपनी स्थापन करु शकतात.

शेतकऱ्यांची कमाई वाढणार

शेणापासून बनवलेल्या पेंटची विक्री वाढल्यानंतर गावामध्ये शेणाची खरेदी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 30 हजार रुपये शेणाच्या विक्रीतून मिळू शकतात. सध्या शेतकरी शेणाचा खत म्हणून वापर करतात. मात्र, रंगाच्या कंपन्या निर्माण झाल्यानंतर हे चित्र बदलणार आहे.

संबंधित बातम्या:

सरकार शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार, गावात कंपनी सुरु करुन मोठी कमाई करा, वाचा सविस्तर

Nitin Gadkari | शेणापासून रंग बनवण्याच्या उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी : नितीन गडकरी

Vedic Paint | गायीच्या शेणापासून वैदिक रंगाची निर्मिती, वैशिष्ट्यं काय?

(Nitin Gadkari will use Khadi or Vedic paint made by cow dung in his house)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.