World’s Third Economy | थांबायचं नाय गड्या, आता थांबायचं नाय, भारताची तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे आगेकूच, अवघ्या 7 वर्षांत लक्ष्य गाठणार

World's Third Economy | 2029 पर्यंत भारत जर्मनी, जपान यांना मागे सारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असा दावा एसबीआय रिसर्चने केला आहे. भारताचा सध्याचा जीडीपी दर 3.5 टक्के आहे. 2027 पर्यंत हा वाचा 4 टक्क्यांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या जर्मनीचा जीडीपी दर 4 टक्के आहे.

World's Third Economy | थांबायचं नाय गड्या, आता थांबायचं नाय, भारताची तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे आगेकूच, अवघ्या 7 वर्षांत लक्ष्य गाठणार
तिसरी आर्थिक महासत्ताImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 10:47 AM

World’s Third Economy | जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्थेत (World’s Largest Economy) भारताने (India, Bharat) मोठी झेप घेतली आहे. ब्रिटनला (Britain) मागे टाकत जागतिक क्रमवारीत भारताने 5 वे स्थान पटकावले आहे. पण ही आता ही विजुगुषी इथंच थांबणार नाही. ‘आरंभ है प्रचंड, बोले मस्तको के झुंड’ या गीतातील ओळीप्रमाणे जागतिक स्पर्धेत झेंडे रोवण्यासाठी भारताने ताकद लावली आहे. आता यापुढे अनेक मैदानं गाजवायची आहेत. आता तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे (World’s Third Economy) घौडदौड सुरु झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि इतर मंत्र्यांनी त्यासाठी हुंकार भरला आहे. तर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) यावर प्रकाश टाकणारा रिसर्च पेपर (Research Paper) तयार केला आहे. 2029 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा अंदाज त्यात व्यक्त केला आहे. एसबीआयचा (SBI) हा शोधनिबंध शनिवारी प्रकाश झोतात आला. भारताने गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच इंग्लंडला आर्थिक बाबतीत धोबीपछाड दिली होती. त्यानंतर त्यात सातत्य राखत भारताने इंग्लंडचं आर्थिक स्थान काबीज केलं आहे.

GDP वाढला

2014 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) 2,6 टक्के होते. त्या तुलनेत आता हा दर 3.5 टक्के आहे आणि 2027 मध्ये तो 4 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या जर्मनीचा जीडीपी 4 टक्के आहे. एसबीआयने दिलेल्या शोधनिबंधात याची माहिती देण्यात आली आहे. 2014 पासून भारताने आगेकूच सुरु केली आहे. विविध स्तरावरील उपाय योजना आणि नवनवीन वाटा चोखंदळत भारताने विकास दर वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत 2014 मध्ये भारताचे 10वे स्थान होते. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानी झेप घेतली. गेल्या वर्षी 2021, डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा भारताने इंग्लंडला धोबीपछाड देत पाचव्या स्थानी झेप घेतली. त्यात सातत्य दिसून आले. आज भारतीय अर्थव्यवस्थेच्या 5 व्या मानांकनावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा प्रवास खडतर असला तरी झपाटल्यागत झाला आहे. आता हा झंझावत पुढे जाईल आणि 2029 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज एसबीआयने शोधनिंबधात मांडला आहे. सध्याच्या वाढीच्या दराने भारताने 2027 मध्ये जर्मनीला आणि बहुधा 2029 पर्यंत जपानला मागे टाकण्याची शक्यता त्यात वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थव्यवस्था गतीने पुढे धावणार

अॅपल आणि इतर अनेक मोठ्या ब्रँडने भारताकडे मोर्चा वळवला आहे. त्यांचे उत्पादन लवकरच भारतातून होईल. त्यामुळे सबलीकरणातून सक्षमतेकडे भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा धावेल, असा अंदाज आहे. येत्या काही दिवसात भारतीय अर्थव्यवस्थेतील हा बदल ठळकरित्या दृष्टीपथास येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2023 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर सध्या 6.7 टक्क्यांपासून 7.7 टक्क्यांपर्यंत गृहित धरण्यात आला आहे. तरीही अनेक संस्थांनी हा अंदाज गृहित धरलेला नाही. प्रत्येकाने त्यांच्या दृष्टीने भारताचे आर्थिक आकलन करुन हा अंदाज कमी नोंदवला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.