बँकांमध्ये असलेल्या 78,213 कोटी रुपयांवर कोणाचा दावा नाही, असा करता येतो त्या रक्कमेवर दावा

तुमची रक्कम बँकेत दावा न करता पडून असेल तर तुम्ही RBI च्या UDGAM पोर्टलद्वारे दावा करू शकता. या पोर्टलवर जाऊन जमा केलेल्या रकमेवर सहज दावा केला जाऊ शकतो. UDGAM पोर्टलवर तुमची नोंदणी केल्यानंतर, तुम्ही लॉग इन करून दावा न केलेली रक्कम तपासू शकता.

बँकांमध्ये असलेल्या 78,213 कोटी रुपयांवर कोणाचा दावा नाही, असा करता येतो त्या रक्कमेवर दावा
money
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 11:00 AM

भारतीय बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या वार्षिक अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतीय बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम 26 टक्क्यांनी वाढली आहे. बँकांमध्ये 78,213 कोटी रुपये पडले असून त्यावर कोणीची दावा केला नाही. मार्च 2023 पर्यंत, डिपॉजिटर एजुकेशन एंड अवेयरनेस फंडात 62,225 कोटी रुपये जमा करण्यात आले.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, 2022 च्या आर्थिक वर्षात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी 32,934 कोटी रुपये होती. परंतु त्या तुलनेत मार्च 2023 अखेर ही रक्कम वाढून 42,272 कोटी रुपये झाली आहे. या कालावधीत 28 टक्के वाढ झाली आहे. यावेळी आरबीआयच्या वार्षिक अहवालात दावा न केलेली रक्कम 26 टक्क्यांनी वाढून 78,213 कोटी रुपये झाली आहे.

काय असते अनक्‍लेम्‍ड डिपॉजिट?

अनक्‍लेम्‍ड म्हणजे वेगवेगळ्या बँका वार्षिक आधारावर खात्यांचे पुनरावलोकन करतात. यामध्ये अशी कोणती बँक खाती आहेत ज्यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही हे देखील कळते. गेल्या 10 वर्षात कोणत्याही ठेवीदाराने कोणत्याही खात्यात कोणताही निधी जमा केला नाही किंवा त्यातून कोणतीही रक्कम काढली गेली नाही, तर या कालावधीत खात्यात असलेली रक्कम दावा न केलेली ठेव मानली जाते. याशिवाय बँकाही या रकमेबाबत ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. ज्या खात्यावर कोणीच दावा करत नाही, त्याची माहिती बँकांकडून आरबीआयला दिली जाते. त्यानंतर ही रक्कम अनक्लेम्ड डिपॉजिट डिपॉजिटर एजुकेशन एंड अवेयरनेस फंडात जमा केली जाते.

हे सुद्धा वाचा

असा करतो येतो दावा

तुमची रक्कम बँकेत दावा न करता पडून असेल तर तुम्ही RBI च्या UDGAM पोर्टलद्वारे दावा करू शकता. या पोर्टलवर जाऊन जमा केलेल्या रकमेवर सहज दावा केला जाऊ शकतो. UDGAM पोर्टलवर तुमची नोंदणी केल्यानंतर, तुम्ही लॉग इन करून दावा न केलेली रक्कम तपासू शकता. तुम्ही दावाही करू शकता किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधू शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.