Hurun Rich List : भारतात नव श्रीमंतांची नांदी! इतके नवीन अब्जाधीश, रेखा झुनझुनावाल टॉपवर

Hurun Rich List : जगात मंदीचे सावट असताना भारतात वेगळेच वारे वाहत आहे. गेल्या काही वर्षांत भारतात नवश्रीमंतांची नांदी आली आहे. एक, दोन, तीन, चार, पाच नव्हे तर भारतात अब्जाधीशांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. या यादीत रेखा झुनझुनवाला या टॉपवर आहेत. या विकसीत देशाच्या जीडीपीपेक्षा या श्रीमंतांची कमाई अधिक आहे.

Hurun Rich List : भारतात नव श्रीमंतांची नांदी! इतके नवीन अब्जाधीश, रेखा झुनझुनावाल टॉपवर
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली : युद्ध, महगाई आणि महामारीने जगाला पछाडलं आहे. जगात झपाट्याने अब्जाधीशांची (Billionaires) संख्या घटत आहे. तर भारतात त्यांची संख्या वाढली आहे. जगात मंदीचे सावट असताना भारतात वेगळेच वारे वाहत आहे. गेल्या काही वर्षांत भारतात नवश्रीमंतांची नांदी आली आहे. एक, दोन, तीन, चार, पाच नव्हे तर भारतात अब्जाधीशांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अनेक जागतीक गुंतवणूकदारांनी भारताचा रस्ता धरला आहे. जगातील अब्जाधीशांची संख्या 8 टक्क्यांनी घसरली आहे. यंदा या यादीत 3,112 अब्जाधीशांना स्थान पटकावता आले आहे. पण भारतात हा आकडा वाढला आहे. विशेष म्हणजे हे नव श्रीमंत शहरी भागातील नाहीत. हुरुन श्रीमंतांच्या यादीत (Hurun Rich List 2023) आणखी काय दडलंय?

अब्जाधीशांची संख्या किती

हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, (Hurun Global Rich) भारतात नवीन अब्जाधीश तयार झाले आहेत. नवीन श्रीमंत तयार होणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान तिसरे आहे. जगभरात एकूण 176 अब्जाधीश तयार झालेत. ते पण केवळ 18 देशांमध्येच. या देशांतील 99 शहरातून हे अब्जाधीश येतात. या यादीत भारताच्या 16 अब्जाधीशांचा समावेश आहे. स्‍टॉक मार्केट (Stock Market) टायकून आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या यादीत सर्वात आघाडीवर आहे. म्हणजेच, या नव श्रीमंतात त्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे.

हे सुद्धा वाचा

5 वर्षांत 30 लाख कोटी कमावले

भारतीय अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीचा विचार करता, गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती प्रचंड वाढली आहे. या काळात, सर्व अब्जाधीशांची मिळून 360 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. हुरुनच्या अहवालानुसार, हाँगकाँगच्या (Hong Kong) सकल देशांतर्गत उत्पादना इतकी (GDP) ही रक्कम आहे. भारतीय अब्जाधीशांबाबत एक विशेष बाब म्हणजे, हे श्रीमंत निमशहरी आणि खेड्या गावातून आलेले आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर हे शिखर गाठले आहे. नवउद्योग, स्टार्टअप बिझनेस या माध्यमातून त्यांनी यशाचे झेंडा फडकावला आहे.

जगात श्रीमंत घटले

जागतिक पातळीवर विचार करता, अब्जाधीशांची संख्या झपाट्याने घटली आहे. हुरुनने वर्ष 2022 च्या यादीत जगभरात 3,384 अब्जाधीश असल्याचा दावा केला होता. तर 2023, या वर्षातील यादीत ही संख्या घटली आहे. यंदा या यादीत 3,112 अब्जाधीशांना स्थान पटकावता आले आहे. जगभरात जवळपास 8 टक्के अब्जाधीश घसरले आहेत. हे सर्व अब्जाधीश 69 देशांचे आहेत. यामध्ये 2,356 कंपन्यांच्या मालकांचा समावेश आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.