UPI च्या मदतीने करा शेअर बाजारात उलाढाल; या तारखेपासून सुविधेचा श्रीगणेशा

Share Market UPI | युपीआय पेमेंटने देशात क्रांतीकारक बदल केले आहे. व्यवहारात गतिमानता आणली आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे व्यवहार अगदी झटपट होत आहे. आता 'UPI फॉर सेकेंडरी मार्केट' ही संकल्पना समोर आली आहे. गुंतवणूकदारांना युपीआयच्या माध्यमातून थेट शेअर बाजारात उडी घेता येणार आहे. काय आहे ही सुविधा?

UPI च्या मदतीने करा शेअर बाजारात उलाढाल; या तारखेपासून सुविधेचा श्रीगणेशा
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 2:06 PM

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : Unified Payments Interface-UPI ने देशात क्रांती आणली आहे. व्यवहारात त्यामुळे सुलभता आली आहे. एका क्लिकवर सहज पेमेंट करण्यासाठी भारतीय नागरीक त्याचा वापर करत आहे. रोख व्यवहारानंतर सर्वाधिक व्यवहार युपीआयमार्फत होतात. आता पैशांच्या व्यवहारापुरता हा प्लॅटफॉर्म मर्यादित राहिला नाही. ग्राहकांना शेअर बाजारात, शेअर खरेदी -विक्रीसाठी युपीआयची मदत होणार आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) ही घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही सुविधा सुरु होत आहे. इक्विटी कॅश सेगमेंटसाठी सध्या ही सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी क्लिअरिंग कॉर्पोरेशन, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, स्टॉक ब्रोकर, बँक आणि युपीआय एपचे पाठबळ असेल.

1 जानेवारीपासून श्रीगणेशा

ही एक दुय्यम बाजार संकल्पना आहे. ही शेअर बाजारातील शेअर खरेदी-विक्रीला पाठबळ देते. एप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट यासारखी सुविधा देण्यास सेबीने मंजूरी दिली आहे. युपीआय सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डेबिट ही थीमवर ती आधारीत आहे. त्याला भारतीय रिझर्व्ह बँकेचे बळ आहे. 1 जानेवारीपासून या सुविधेचा श्रीगणेशा होत आहे.

हे सुद्धा वाचा

मर्यादीत ग्राहकांसाठी ही सुविधा

राष्ट्रीय देयके महामंडळानुसार, ही सुविधा सुरुवातीला मर्यादीत ग्राहकांसाठी सुरु करण्यात येत आहे. हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. या पथदर्शी प्रकल्पात गुंतवणूकदार बँकेतील रक्कमेच्या आधारे बाजारात गुंतवणूक करु शकतात. ही रक्कम मध्येच बंद करु शकतात. ट्रेड पूर्ण झाल्यावर ग्राहकाच्या खात्यातून रक्कम वळती होईल. क्लिअरिंग कॉर्पोरेशन या ग्राहकांन थेट T+1 या आधारावर पुढील प्रक्रियेचा लाभ देईल. सुरुवातीच्या टप्प्यात HDFC Bank आणि ICICI Bank चे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Groww ची भरारी

युपीआय फॉर सेंकडरी मार्केट या संकल्पनेवर हे काम होईल. त्यासाठी Groww हा स्टार्टअप, ब्रोकरेज एप काम करेल. तर BHIM, Groww आणि Yes Pay Next यांना युपीआय एपसाठी शेअर बाजाराची प्रक्रिया पूर्ण करता येईल. सुरुवातीच्या टप्प्यात HDFC Bank, HSBC, ICICI Bank, Yes Bank , क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि एक्सचेंजसाठी स्पॉन्सरचे काम करतील. या प्रक्रियेत zerodha आणि इतर बँका लवकरच सहभागी होतील.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.