Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inflation : टोमॅटोच नाही तर हे पण महागाईचे खेळाडू, जाणून घ्या किती वाढल्या किंमती

Inflation : देशात जून जुलैमधील महागाई वाढली आहे. महागाईसाठी केवळ टोमॅटोच नाही तर इतर अनेक घटकांचा समावेश आहे. भाजीपाल्यासह अन्नधान्याच्या किंमती वाढल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला.

Inflation : टोमॅटोच नाही तर हे पण महागाईचे खेळाडू, जाणून घ्या किती वाढल्या किंमती
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 5:39 PM

नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : देशात महागाई (Inflation) उच्चांकावर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. सोशल मीडियापासून ते गावाच्या पारापर्यंत सगळीकडे महागाईची चर्चा रंगली आहे. सध्या टोमॅटोच्या वाढत्या किंमती चर्चेच्या मध्यभागी आहे. टोमॅटोची महागाई केंद्र बिंदुवर आहे. अनेकांना वाटते की जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) सर्वाधिक वाढल्या. पण इतर ही अनेक घटकांनी महागाई वाढविण्यात हिरारीने सहभाग घेतला आहे. टोमॅटोसह दूध, डाळ, गहू, पीठ, कांदा, इतर भाजीपाला महागला. गव्हाने, तांदळाने तर आता कहर केला आहे. येत्या काही दिवसात तर या किंमती अजून भडकण्याची भीती आहे. केंद्र सरकार त्यावर हस्तक्षेप करण्याची तयारी करत आहे. या दोन महिन्यात महागाईत वाढ झाली. प्रत्येक घटकाने महागाई वाढविण्यास हातभार लावला.

अशा वाढल्या किंमती

हिंदुस्थान वृत्तपत्रातील बातमीनुसार, मे महिन्यापेक्षा जुलै महिन्यात किंमती अधिक वधारल्या. जून ते जुलै या काळात टोमॅटोच्या किंमतीत 363.8 टक्के उसळी आली. तर कांद्याने पण महागाईला आवताण दिले. काद्यांच्या किंमती 20.7 टक्के वाढल्या. बटाट्यांच्या किंमती अजून जास्त वाढलेल्या नाहीत. तरीही मे महिन्यापासून यामध्ये 15.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

टोमॅटोचा चढता आलेख

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डाळींचा हिस्सा किती

पावसाळा सुरु होताच तूरडाळीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. तूरडाळीच्या किंमतीत वाढ सुरुच आहे. गेल्या वर्षीपासूनच डाळीच्या किंमतींनी महागाईत भर टाकली आहे. पावसाळा सुरु होताच जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान तूरडाळीच्या किंमतींनी 12.5 टक्क्यांची उसळी घेतली. उडदाची डाळ 3.9 टक्क्यांनी महागली.

तांदळाची भरारी

अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने या आठवड्यात आकडेवारी संसदेसमोर मांडली. तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार ठेवत आहे. पण गेल्यावर्षीपासून किंमती सूसाट आहे. त्यातच निसर्गचा फटका बसल्याने तांदळाने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी तांदळाची सरासरी किंमत 41 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. गेल्यावर्षी हा भाव 37 रुपये होता.

गव्हाची 2.2 दरवाढ

गव्हाच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. त्याचा थेट परिणाम गव्हाच्या सीलबंद पीठापासून इतर सर्व पदार्थांवर दिसून येत आहे. बिस्किटापासून ते ब्रेडपर्यंत सर्वांच्या किंमती वधारल्या आहेत. हा महागाई दर 2.96 टक्क्यांहून 4.49 टक्क्यांवर पोहचला आहे. गव्हाच्या किंमती वधारल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दूधाच्या किंमतीत किती वाढ

गेल्यावर्षीपासूनच दूधाच्या किंमतींना दरवाढीचा ज्वर चढला. दूधाची दरवाढ थांबायची नावं घेत नसल्याचे चित्र आहे. गायीचे आणि म्हशीचे विविध दर्जाचे दूध वेगवेगळ्या भावाने मिळत आहे. पॅकबंद दूधाचे दर तर आकाशाला भिडले आहेत. अनेक दूध उत्पादक, वितरण कंपन्यांनी या वर्षभरात मोठी दरवाढ केली. या दोन महिन्यात ही दरवाढ 1.3 टक्के आहे.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.