Novelis च्या रुपाने बिर्ला समुहाची अमेरिकेत मोठी गुंतवणूक
लो-कार्बन अ ॅल्युमिनिअम पुनर्वापर आणि रोलिंग प्लांट तयार करण्यासाठी नॉव्हेल 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. उत्तर अमेरिकेत अॅल्युमिनिअम पेय कॅन शीट्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नव्या सुविधेचा वापर करण्यात येणार आहे.
आदित्य बिर्ला समूहाने नॉव्हेलिस (Novelis) या अग्रगण्य ब्रॅण्डच्या रुपाने अमेरिकेत मोठी गुंतवणूक केली आहे. नॉव्हेलिस हा अॅल्युमिनियम रोलिंग अँड रिसायकलिंगमधील जागतिक अग्रणी ब्रॅण्ड आहे. ही कंपनी अमेरिकेतील अलाबामा राज्यातील बे मिनेट (Bay Minette) येथे नवीन लो-कार्बन रीसायकलिंग आणि रोलिंग प्रकल्प तयार करण्यासाठी 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. अत्यंत प्रगत सुविधा आधारित हा प्रकल्प अमेरिकेत भट्टी तापवणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी प्रारंभिक 600 किलो टन अॅल्युमिनिअम तयार होईल. या गुंतवणूकीमुळे नोव्हेलिसच्या आणखी एका परिवर्तनवादी वाढीच्या टप्प्याची सुरुवात झाली आहे,” असे आदित्य बिर्ला समूह (Aditya Birla Group) आणि नोवेलिस बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले. आदित्य बिर्ला समूहाचा हा सर्वात मोठा जागतिक ग्रीनफिल्ड विस्तार प्रकल्प आहे आणि यामुळे समूहाची अमेरिकेतील एकूण गुंतवणूक 14 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक टिकाऊ पॅकेजिंगमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या अॅल्युमिनियम कोटेटे शीतपेय कॅन शीट्सची (aluminium beverage can sheets) मागणी वाढली आहे. नवीन सुविधांचा वापर करून उत्तर अमेरिकेतील या प्रकल्पात वाढती मागणी पूर्ण करण्यात येणार आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून, आमच्या ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच यामुळे ब्रॅण्ड ही मोठा होणार आहे. कमी-कार्बन, अत्यंत टिकाऊ अॅल्युमिनियम सोल्यूशन्सच्या त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पातून लवकरच प्रत्यक्ष उत्पादन घेण्यात येणार असल्याचे नोवेलिस इंकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह फिशर यांनी सांगितले.
संपूर्णपणे एकात्मिक, ग्रीनफिल्ड रिसायकलिंग आणि रोलिंग प्लांट तयार करण्याच्या उत्तर अमेरिकन मागणी नॉव्हेलिसच्या निर्णयामुळे पूर्ण होत असून कॅन उत्पादक आणि पेय कंपन्यांकडून सपाट-रोल्ड, लो-कार्बन अॅल्युमिनियमचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. अॅल्युमिनिअम पेयाचे डबे, बाटल्या आणि कप हे शाश्वत पॅकेजिंग आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे मॉडेल आहेत. केवळ दोन महिन्यांच्या सरासरी “कॅन-टू-कॅन” लाइफसायकलसह, आज पुनर्नवीनीकरण केले जाणारे कॅन 60 दिवसांच्या आत स्टोअर शेल्फवर तयार होऊन परत येत आहेत.
अशी सुविधा उपलब्ध करून देणारी 40 वर्षांतील अमेरिकेतील ही पहिली पूर्णपणे इंटिग्रेटेड अॅल्युमिनिअम मिल असेल. त्यातून आधुनिक उत्पादनासह हजारांहून अधिक जणांना जास्त मिळकतीची आणि उत्तम करिअरची संधी प्राप्त होईल. हा प्रकल्प शुन्य कचरा व्यवस्थापनावर आधारित असेल. यामध्ये अनेक गोष्टींचा पुनर्वापर होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वर्धित वास्तव आणि रोबोटिक्ससह प्रगत ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा या प्रकल्पात महत्त्वपूर्ण वापर केला जाणार आहे.