आता देशात वीज महागणार; सरकारच्या नव्या नियमाचा काय परिणाम?, जाणून घ्या

वीजनिर्मिती कंपन्यांसोबतच वितरण कंपन्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशातील ऊर्जा क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झालेय. देशात सौरऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आलीय, परंतु आता भारतातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत कोळसा हा आहे. देशातील त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते.

आता देशात वीज महागणार; सरकारच्या नव्या नियमाचा काय परिणाम?, जाणून घ्या
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 6:16 PM

नवी दिल्लीः देशभरातील जनता महागाईने हैराण झालीय. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण आता विजेचे दरही वाढू लागलेत. याचे कारण सरकारचा नवा नियम आहे. देशातील कोळशाचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने नवा नियम लागू केलाय. ऑटोमॅटिक पासथ्रू मॉडेल अंतर्गत जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढतात, तेव्हा राज्य वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम) वीज खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते.

या तीन शहरांमध्ये प्रति युनिट 33 पैसे इंधन अधिभार

त्याचा परिणाम राजस्थानमध्ये सुरू झालाय. राज्यातील जयपूर, जोधपूर आणि अजमेर या तीन शहरांमध्ये डिस्कॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांवर प्रति युनिट 33 पैसे इंधन अधिभार लावलाय. त्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी राज्यातील सर्व श्रेणीतील ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होणार आहे. देशातील इतर राज्येही लवकरच हे करू शकतात.

वीज वितरण कंपन्या तोट्यात

वीजनिर्मिती कंपन्यांसोबतच वितरण कंपन्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशातील ऊर्जा क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झालेय. देशात सौरऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आलीय, परंतु आता भारतातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत कोळसा हा आहे. देशातील त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते.

तेव्हा ऊर्जा उत्पादक कंपन्यांचा खर्चही वाढेल

अशा परिस्थितीत जेव्हा जगात इंधनाचे दर वाढतील, तेव्हा ऊर्जा उत्पादक कंपन्यांचा खर्चही वाढेल. यामुळे ग्राहकांसाठी विजेचा दर वाढवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करणार आहेत. स्वयंचलित पासथ्रू मॉडेलचा शस्त्रासारखा वापर करून या कंपन्या राज्यांना महागडी वीज विकणार आहेत. यानंतर डिस्कॉम्सही वीज दर वाढवतील.

पेट्रोल, डिझेलप्रमाणे विजेचे दरही दररोज बदलतात

सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास ही प्रणाली देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये बदल केल्याप्रमाणे काम करेल. यासह या गोष्टींप्रमाणे दररोज विजेच्या दरात वाढ होताना दिसत आहे. देशातील सर्व राज्यांतील डिस्कॉम्स आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही. यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात उत्पादित होणारी 60 टक्के वीज जीवाश्म इंधनापासून तयार होते. अशा परिस्थितीत जर एखाद्या राज्याने विजेच्या दरात वाढ केली. त्यामुळे इतर राज्येही हे पाऊल उचलतील. म्हणजेच येत्या काही दिवसांत तुमचे वीजबिल वाढणार आहे.

संबंधित बातम्या

Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅमची किंमत?

LIC IPO: LIC ची मूल्यांकन प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण, चौथ्या तिमाहीत IPO येणार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.